farmer seriously injured in a leopard attack at Kehal Tanda in Jintur taluka marathi news  
मराठवाडा

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथील घटना

जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर, ता.७ (बातमीदार) : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा शिवारात शुक्रवारी (ता.७) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. यापूर्वीही या भागात बिबट्याने अनेक शेतकरी नागरिक तसेच पशुधनावर हल्ले केले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा वनविभागाला माहिती देऊनही वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

तालुक्यात बिबटे नील गायी हरीण, कोल्हे यासह वन्य पशुपक्ष्यांचा वावर आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असून डोंगर भागात वन्यजीवांना सावलीसाठी झाडे नाही, चारा नाही, पिण्यासाठी पाणीही नाही, त्यामुळे हे वन्यजीव मानवी वस्त्यांमध्ये धाव घेत आहेत. त्यातूनच पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने

शुक्रवारी (ता.७) केहाळ तांडा येथील शेतकरी शेषराव जाधव (४५ वर्षे) हे भल्या पहाटे गाईचे दूध काढण्यासाठी शेत आखाडयावर गेले असता बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले. सदरच्या घटनेमुळे तांडा वस्तूवरील नागरिकांत भितीचे वातावरण असल्याने वनविभागाने तात्काळ शोध घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व सदर शेतकऱ्यास योग्य ती मदत द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा विसर्जनाच्या प्रतीक्षेत, चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT