farmer suicides because of Debt in Hadagaon taluka Nanded
farmer suicides because of Debt in Hadagaon taluka Nanded 
मराठवाडा

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; हदगाव तालुक्यातील घटना 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततच्या नापिकीला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना खरटवाडी (ता. हदगाव) येथे शनिवारी (ता. 4) दुपारी घडली. 

खरटवाडी (ता. हदगाव) येथील शेतकरी विलास रंगराव शेबेटवाड (वय 30) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. कधी आवर्षण तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. घरखर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या विलास शेबेटवाड यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी त्याने विष प्यायले. लगेच नातेवाईकांनी त्याला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस नाईक डब्ल्यु. के. कांबळे यांच्या फिर्यादीवरुन मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पवार हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT