soyabean latur
soyabean latur 
मराठवाडा

शेतकऱ्यांना तारण योजनेत चार कोटींचा फायदा

हरी तुगावकर

लातूर ः गेल्या काही वर्षांत हंगाम सुरू होताच बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कोसळतात. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीन शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे.

गेल्या सहा वर्षांत तेराशे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून या शेतकऱ्यांना चार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, हे या योजनेचे मोठे यश आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा देणारी ही मराठवाड्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. 

50 हजार क्विंटलच्या घरात आवक
दरवर्षी हंगाम सुरू झाला, की बाजारपेठेत सोयाबीनची मोठी आवक असते. लातूरच्या बाजारपेठेत तर ही आवक 50 हजार क्विंटलच्या घरात जाते. आवक वाढल्याने सोयाबीनचे भाव कोसळतात. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. कमी किमतीत आपले सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. हे लक्षात आल्यानंतर पणन मंडळातर्फे शेतीमाल तारण योजना राबविली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी ठेवलेल्या सोयाबीनला बाजार भावाच्या 75 टक्के रक्कम सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना दिली जाते. ज्या वेळेस बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव येतो, त्या वेळेस हे सोयाबीन विकून शेतकऱ्यांनी आपला आर्थिक फायदा घ्यावा, असा या योजनेचा उद्देश आहे.

सुमारे तेराशे शेतकऱ्यांचा सहभाग

योजनेची प्रभावी अंमलबजावणी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. बाजार समितीच्या या योजनेत 2013-14 ते 2018-19 या सहा वर्षांच्या कालावधीत सुमारे तेराशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सुमारे 46 हजार क्विंटल सोयाबीन या योजनेत ठेवले होते. यात बाजार समितीने या शेतकऱ्यांना 17 कोटी 18 लाख 18 हजार 258 रुपयांचे कर्ज वाटप केले होते.

बाजारपेठेत ज्या वेळेस भाव वाढले त्यावेळेस शेतकऱ्यांनी हे सोयाबीन विकले असून यात शेतकऱ्यांना चार कोटी सात लाख 39 हजार 876 रुपयांचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना अशा पद्धतीने फायदा करून देणारी ही मराठवाड्यातील पहिली बाजार समिती आहे. 
 

लातूर बाजार समितीच्या बाजारपेठेत दरवर्षी सोयाबीनची आवक मोठी असते. आवक जास्त झाली की भाव कमी मिळतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन ही योजना सुरू केली. याला शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. यातून त्यांना हा फायदा झाला आहे. बाजारपेठेवर लक्ष ठेवून सोयाबीन विकले पाहिजे. फायदा निश्‍चित होतो. यावर्षी देखील बुधवारपासून ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येत आहे. 
ललित शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT