file photo 
मराठवाडा

आता हेच राहील होत.... ‘मास्क’मध्येही फॅशनचा शिरकाव

कैलास चव्हाण

परभणी : एरवी रुग्णालयात शस्त्रक्रिया करतानाच वापरले जाणारे मास्क आता सर्वसामान्य झाले आहेत. कोरोनामुळे मास्कशिवाय घराबाहेर पडणे म्हणजे धोक्याचे झाल्याने सर्वांनाच मास्क अनिवार्य झाला आहे. त्यामुळे अन्य गरजू वस्तूप्रमाणे आता मास्कदेखील आवश्यक झाल्याने मास्कमध्येदेखील फॅशनने शिरकाव केला आहे. सध्या बाजारपेठ कपड्याच्या रंगाला सूट होणारे, दिसायला आकर्षक, रंगीबेरंगी, लहान मुलांसाठी कार्टूनच्या रूपात, महिला, तरुणींसाठी विविध प्रकारचे मास्क आले आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण जग बदलले आहे. सर्वच क्षेत्रात गंभीर परिणाम झाले आहेत. सततच्या लॉकडाउनमुळे जीवनशैलीतदेखील बदल झालेला आहे. तसेच राहणीमानातदेखील मोठा बदल झाला आहे. याआधी शहरी भागात पुरुष मंडळीच्या कपड्यासोबत खिशात हातरुमाल असायचा, तर ग्रामीण भागात खांद्यावर पांढराशुभ्र रुमाल. महिलासोबतही स्कार्फ, छोटा रुमाल. घराबाहेर पडताना या गोष्टी सोबत नेण्याची सवय. लहान मुलांनादेखील शाळेत जाताना शाळेचा गणवेश, दप्तर, खाऊचा डब्बा, पाणी बॉटल हे साहित्य असते. जेव्हापासून कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हापासून सर्वांच्या वेषभूषेत कमालीचा बदल झालेला आहे. आता रुमालाच्या सोबतीला आणखी एक वस्तू आली आहे आणि ती अनिवार्य झाली आहे. ती वस्तू अर्थात मास्क होय.

मास्कची बाजारपेठ भरली
मार्च महिन्यात देशात कोरोनाचे संकट आले अन् सर्वत्र लॉकडाउन घोषित झाले. कोरोनाला रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे, पडल्यास दूर राहून बोलणे, तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणे या नवीन गोष्टींची भर पडली आहे. घरातून बाहेर निघताना आधी तोंड बांधूनच बाहेर पडावे लागत आहे. त्यासाठी कोणी रुमाल, तर कोणी मास्कचा वापर करत आहे. मास्क ही वस्तू पूर्वी केवळ रुग्णालयातच वापरली जायची. रस्त्याने कुणी मास्क घालून जाताना पाहिल्यास तो डॉक्टर अथवा रुग्णालयीन कर्मचारी किंवा एखाद्या श्वसनाच्या आजाराने ग्रस्त व्यक्ती समजला जाई. परंतु, कोरोनापासून मास्क सर्वसामान्य झाला आहे. प्रत्येकालाच मास्क वापराला लागत असल्याने मास्कची बाजारपेठ भरली आहे. 

 शंभर ते १५० रुपयांना विक्री
सुरवातीला मास्कचा एवढा तुटवडी पडला की, अत्यंत साधे घरगुती मास्क १०० ते १५० रुपयाला विक्री केले जात होते. अनेक ठिकाणी मास्कचे साठे करून चढ्या दराने विक्री करण्याचा उद्योग काहींनी केला. तेव्हा मास्कचे महत्त्व कळायला लागले. त्यानंतर हळूहळू मास्क निर्मितीकडे अनेकांना लक्ष देत मोठ्या प्रमाणात मास्क निर्माण केल्याने सद्यःस्थितीला रस्त्यावर कुठेही मास्क सहज आणि माफक दरात उपलब्ध होत आहेत. आता तर मास्कची स्वतंत्र बाजारपेठ उदयाला आली आहे.

मास्कचे विविध ब्रॅंड बाजारात
सध्या बाजारात कपड्यांच्या दुकानात विविध प्रकारचे मास्क आले आहेत. मास्क ही आता अनिवार्य गरज बनल्याने प्रत्येकाला ती लागणार हे ओळखून अनेक कापड निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मास्कचे विविध ब्रॅंड बाजारात आणले आहेत. कपड्याप्रमाणे मास्कमध्येदेखील फॅशनने एंट्री घेतली आहे. कपड्याच्या रंगाना, व्यक्तीच्या देहबोलीला सूट होणारे मास्कचे प्रकार आले आहेत. तसेच लहान मुलांना अवडणाऱ्या कार्टूनच्या रूपातदेखील मास्क आले आहेत. छोटा भीम, ॲंग्री बर्ड यासारख्या कार्टून रूपात मास्क विक्रीस आले आहेत. त्यासोबतच महिलांना सूट होणारे, रंगरूपाप्रमाणे साजेशे असे मास्क आल्याने भविष्यात मास्कची मोठी बाजारपेठ उदयाला येणार हे नक्की आहे.
 

 मुंबई, बेंगलोर येथील मास्क
कपड्याप्रमाणे मास्कमध्येदेखील फॅशन आली आहे. मुंबई, बेंगलोर येथील विविध कापड निर्मिती करणाऱ्या नामांकित कंपन्यांचे मास्क आले आहेत. ५० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहेत.
- विक्की नारवानी, व्यापारी परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT