मराठवाडा

अखेर मुलींच्या शिक्षणासाठी गावात एस. टी. दाखल

वृत्तसंस्था

मुक्रमाबाद ( नांदेड)- गावात एस.टी. बस येत नसल्यामुळे गावातील सर्वच विद्यार्थीनींना शिक्षण घेण्यासाठी मैलौ दूर पायपीठ करून शाळेत जावे लागत होते. तर मुलींना शाळेत जाण्यासाठी सुविधा.नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींचे चालू शिक्षण बंद केले होते. आगार प्रमुखाकडे अनेकदा मागणी करून एस.टी बस सोडत नसल्यामुळे येथील सर्वच मुलींना शिक्षण सोडण्याची वेळ आली होती.

परंतु, दै. सकाळने मंगळवार दि. 16 अॉक्टोबर रोजी मुलींची शिक्षणासाठी धडपड या मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रकाशित करताच प्रशासन प्रशासन खडबडून जागे झाले व विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी शनिवार दि. 20 पासून कायम स्वरूपी एस.टी सुरूवात केल्यामुळे सर्वच विद्यार्थीनींचे शिक्षण पुर्ण होणार आहे.

मुखेड तालुक्यातील अंबुलगा हे, गाव अतिशय आडवळणाला असल्यामुळे अनेक सोयी पासून वंचीत असून दळणवळणाची कुठलीच साधने नाहीत गावात दररोज एस.टी. येत नसल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनीची गैरसोय होत असल्यामुळे व शाळेत जाण्यासाठी मैलो दूर पायी चालत जावे लागत होते आणि रात्री घराकडे यावे लागत असल्यामुळे मुलीच्या सुरक्षेतेसाठी पालकांनी आपल्या मुलींना शाळेत व महाविद्यालयात पाठविण्याचे बंद केले होते. पण, दै. सकाळने सामाजिक बांधिलकी जोपासत मुलींचे शिक्षण पुर्ण होण्यासाठी सतत पाठ पुरावा केल्याने देगलूर येथील आगार प्रमुखाने देगलूर, अंबुलगा व हासनाळ ही, एस.टी. कायम स्वरूपी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असून शनिवार दि. 20 पासून या एस.टी. गावात येण्यास सुरूवात झाली असल्यामुळे गावातील व आसपासच्या सर्वच विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असून आमचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी दै. सकाळने महत्त्वाचा पुढाकार घेऊन आम्हांला एस.टी.मिळवून दिली त्याबद्दल सर्वच मुलीनी दै. सकाळचे अभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT