Flower-Loss
Flower-Loss 
मराठवाडा

परतीच्या पावसाने ५५ लाखांचे नुकसान

मंगेश शेवाळकर

हिंगोली - दसरा सणाला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळाला नसला तर दिवाळी मात्र चांगली होईल या अपेक्षेने झेंडूची बाग जपणाऱ्या पार्डी पोहकर (ता.सेनगाव) येथील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले. या भागात तब्बल ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर हे झेंडू फुलांचे उत्पादकांचे गाव म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सुमारे दोनशे एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर झेंडूचे उत्पादन घेतले जाते. पुणे, नाशीक, हैदराबाद, बेंगलोर या भागातील व्यापारी शेतात येऊन झेंडूची फुले खरेदी करतात. दरवर्षी दिवाळी व दसरा सणामधे सुमारे साठ ते ७० लाख रुपयांची उलाढाल होते. 

यावर्षीही या भागातील शेतकऱ्यांनी झेंडूची फुले घेतली होती. मात्र दसरा सणाच्या वेळी तीन ते चार रुपयेच भाव मिळाल्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही.  त्यानंतर दिवाळीला फुल खरेदीसाठी बाहेरच्या व्यापाऱ्यांनीही होकार दर्शवला होता. त्यानुसार दिवाळीला चांगला दर मिळून नेहमी प्रमाणे पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना  होती. मात्र परतीच्या पावसामुळे या फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. परतीच्या पावसामुळे फुले झाडावरच सडून गेली तर झाडे देखील सडल्याने बाहेर राज्यातील व्यापारी फुलांच्या खरेदीसाठी आलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. 

नुकसान कसे सहन करावे - सुभाष पोहकर, शेतकरी 
दरवर्षी  संपूर्ण गावातून फुलांचे उत्पादन घेतले जाते. कमीत कमी ५५ लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे दिवाळीचा सणही साजरा करता आला नाही. शासनाने या भागात नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT