भोकरदन : देशमुख गल्लीत गणेश मंडळाचे उभारण्यात आलेले चांद्रयान देखाव्यातील प्रक्षेपक.
भोकरदन : देशमुख गल्लीत गणेश मंडळाचे उभारण्यात आलेले चांद्रयान देखाव्यातील प्रक्षेपक.  
मराठवाडा

पावसाने फेरले 'चांद्रयाना'वर पाणी 

तुषार पाटील

भोकरदन  (जि.जालना) - सर्व तयारी झालेली होती; पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. दिवसभर रिपरिप, नुसता चिखल झालेला. प्रयत्न निष्फळ ठरले आणि चांद्रयानावर पावसाने पाणी फेरले. भोकरदनच्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा बुधवारी (ता. 11) हिरमोड झाला. 

भोकरदन शहरातील देशमुख गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे नावीन्याचा ध्यास घेणारे. दरवर्षी नवीन काहीतरी करावे यासाठी प्रयत्न आणि परिश्रमाची शिकस्त. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे देखावे सादर करण्याची पर्वणीच. शिवाय भोकरदनला तशी परंपराही. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाचे कार्यकर्ते सजीव-निर्जीव देखावा सादर करण्यासाठी दिवसभर कष्ट घेतात तसा देशमुख गल्लीतील मंडळानेही यंदा मोठ्या कौतुकाने 'चांद्रयान' प्रोजेक्‍ट हाती घेतला. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणले. चांद्रयानचे मार्क- 3  प्रक्षेपकही तयार केले. मात्र, बुधवारी पाऊस काही थांबायला तयार नव्हता. त्यामुळे देखावा उभारणीही अशक्‍य बनली. पावसात भिजत काही हौशी कार्यकर्त्यांनी कसेबसे उपग्रह प्रक्षेपक यान उभेही केले; पण सायंकाळनंतर मात्र पावसाचा असाकाही जोर वाढला की प्रयोग काही पुढे गेला नाही. अपेक्षित टप्पा गाठता आला नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळातर्फे आम्ही यंदा चांद्रयान मोहीम देखावा सादर करणार होतो, मिशन मंगलही देखावा तयार करण्याचा विचार होता. मात्र, सततच्या पावसामुळे यात व्यत्यय आला. तरिही कार्यकर्त्यांनी पावसात भिजत चांद्रयान देखावा उभारण्यासाठी मेहनत घेतली; मात्र पावसामुळे प्रयोग पुढे नेता आला नाही. 
सतीश तुपे, 
अध्यक्ष, गणेश मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT