CBI
CBI 
मराठवाडा

अमोल काळेच्या सहभागाचा संशय

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - पत्रकार गौरी लंकेश हत्येतील संशयित अमोल काळे याचा डॉ. नरेंद दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा दाट संशय "सीबीआय'ला आहे. हा धागा तपासण्यासाठी "सीबीआय'ने कर्नाटक एसआयटीकडून अमोल काळेला रविवारी (ता. दोन) ताब्यात घेतले. त्यानंतर आता त्याचे अंदुरे, कळसकर व पांगारकरसोबतचे संबंध तपासण्यात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गौरी लंकेश हत्येचे औरंगाबाद कनेक्‍शन समोर आल्यानंतर तपासासाठी गेल्या आठवड्यात कर्नाटक एसआयटीचे पथक औरंगाबाद व मुंबईत गेले होते. त्यांनी डॉ. दाभोलकर व नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणातील संशयितांची चौकशी केली. काळेचा डॉ. दाभोलकर हत्येतील कळसकर, अंदुरे; तसेच नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणातील संशयित श्रीकांत पांगारकरसोबत संबंध होते; तसेच काळेचा औरंगाबाद-जालन्यातही वावर होता, अशी माहिती समोर आली आहे. या संशयितांच्या साखळीला राजेश डी. बंगेरा याने शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले. अंदुरे व कळसकरचाही प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये समावेश होता, असा संशय सीबीआयला आहे. या सर्व संशयितांचा अमोल काळेशी संबंध येत असल्याने डॉ. दाभोलकर प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची बाब पुढे आली.

गुन्ह्यांतील गुंतागुंत तपासणार
गौरी लंकेश-डॉ. दाभोलकर; तसेच नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणातील सहभागी संशयितांची एकमेकांशी गुंतागुंत आहे; परंतु काही संशयितांचा मुख्य संशयितांसोबतच संबंध आला, इतरांशी फारसा परिचय नसून त्यांच्या कृत्याबाबतही त्यांना फारशी माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही गुन्ह्यांची गुंतागुंत तपासण्यासाठी महाराष्ट्र एटीएसनेही गौरी हत्येतील संशयितांची चौकशी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT