पूजा खंडागळे
पूजा खंडागळे  
मराठवाडा

विजेचा धक्का लागून तरुणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

आडूळ (जि.औरंगाबाद ) ः नळाला पाणी येणार असल्याने विद्युत मोटारीचे वायर जोडत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. सात) दुपारी तीनच्या सुमारास आडूळ बुद्रुक (ता. पैठण) येथे घडली.

सध्या गावात भीषण पाणीटंचाई असल्याने तब्बल एका महिन्यानंतर रात्री-अपरात्री केव्हाही गावात फक्त एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास नळाला पाणी येणार होते. त्यामुळे पूजा ऊर्फ गंगा जनार्दन खंडागळे (वय 17) ही बारावीत शिकणारी विद्यार्थिनी पाणी भरण्यासाठी खाली खड्ड्यात नळाला विद्युत मोटार लावीत असताना तिला अचानक खड्ड्यामध्येच विजेचा धक्का लागला. सदरील घटना गल्लीतील इतर महिलांनी पहिल्यानंतर त्यांनी लगेच आरडाओरड करून तिच्या हातात असलेल्या वायरमधील विद्युत पुरवठा खंडित केला व तिला ताबडतोब आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

परंतु, परिस्थिती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी तत्काळ औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान पूजा हिचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील भीषण पाणीटंचाईचा हा दुसरा बळी गेला आहे. एका गरीब कुटुंबातील तरुणीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. येथील नागरिकांना पाणीटंचाई ही पाचवीला पुजली असल्याने येथील पाणी प्रश्न केव्हा मार्गी लागेल असा संतप्त सवाल यानिमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. येथील ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT