Loot
Loot sakal
मराठवाडा

Crime News : सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटले

सुभाष बिडे

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास राजेगाव शिवारात अडवून चाकूचा धाक दाखवून पाच लाख अडतीस हजार 655 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

घनसावंगी, जि. जालना - घनसावंगी येथून देवडेहादगाव येथे बाजार करण्यास जाणाऱ्या सोन्या-चांदीचे व्यापाऱ्यास राजेगाव शिवारातील खडीमशीनजवळ अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच लाख अडतीस हजार 655 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनसावंगी येथील न्यु सराफा मार्केट बाजार रोड सोन्या चांदीचे व्यापारी येथील दुकानदार अरविंद दत्तात्रय चिंतामणी हे शुक्रवार (ता. २५) सकाळी आठ वाजता घनसावंगी हून सकाळी राजेगाव मार्गे देवडीहादगाव येथे दुकान करण्यासाठी जात आसतांना राजेगाव शिवारातील खड़ी मशीनजवळील रोडवर अनोळखी दोन इसमांनी संगणमत करुन अरविंद चिंतामणी यांच्या मोटार सायकलचा पाठलाग करुन चाकुचा धाक दाखवून मोटारसायलसह खाली पाडले त्यांच्या कडील सोन्याची अंगठी व सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग जिची किंमत पाच लाख अडोतीस हजार ६५५ रुपयांचा ऐवज चाकुचा धाक दाखवून बळजबरीने घेवुन गेले.

या घटनेनंतर हा प्रकार घनसावंगी पोलिसाना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रंशात महाजन, उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कल्याणराव सपाटे यांनी गावकऱ्यासह भेट देऊन घटनेची माहिती घेतली या प्रकरणी अरविंद, चिंतामणी यांनी दिलेल्या पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे म्हणुन गुन्हा करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT