file photo
file photo 
मराठवाडा

Good News ; हिंगोलीत कोरोना तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन होणार उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली येथे लवकरच कोरोना तपासणी लॅब सुरु होणार असून त्यासाठी ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार आहे. लवकर ही मशीन बसणार असून त्यामुळे जिल्हावासियांची सोय होणार आहे. खासदार राजीव सातव यांनी यांनी केलेल्या मागणीला शासनाचा प्रतिसाद मिळाला आहे.

जिल्ह्यात मुंबई, पुणे, नाशीक या शहरातून येणाऱ्या मजूरांची तसेच गावकऱ्यांची संख्या भरपूर आहे. प्रत्येक तालुक्यात किमान सात ते आठ हजार मजूर टप्प्या टप्प्याने येत आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविणे, त्यानंतर काही जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर संक्रमण साखळी शोधणे यासाठी कालावधी लागत आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्‍ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी -

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र
खासदार ॲड. राजीव सातव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठविले होते. त्‍यांच्या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हिंगोलीत ट्रु नेट मशीन उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात ही मशीन ठेवली जाणार आहे.
 
हेही वाचा - नृत्यातून आनंदी जीवन जगण्याचा विद्यार्थ्यांचा संदेश... -

जिल्‍ह्यात आतापर्यंत १८० कोरोना रुग्ण
कोरोना टेस्‍ट लॅब सुरू झाल्यानंतर सर्व चाचण्या हिंगोली जिल्‍ह्यात होतील. त्‍यामुळे चाचण्यांची संख्याही वाढविता येणार आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत १८० कोरोना रुग्ण आढळले आहेत. दररोज या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्यांची वाढती संख्या सुरूच आहे.

अहवाल येण्यास लागतोय उशिर
सध्या हिंगोलीतून स्‍वॅब तपासणीसाठी औरंगाबाद किंवा नांदेड येथे पाठवले जातात. तेथील लॅबमध्ये टेस्‍टींगचे प्रमाण जास्‍त असल्यामुळे अहवाल येण्यास खुप उशिर लागत आहे. त्‍यामुळे हिंगोली जिल्‍ह्यात कोरोना स्‍वॅब टेस्‍टींग लॅब लवकरात लवकर सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासदार ॲड. सातव यांनी रविवारी (ता.३१) वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्र पाठवुन केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

SCROLL FOR NEXT