dead
dead 
मराठवाडा

हळद फिटण्यापूर्वीच रेल्वेसमोर उडी घेऊन नवरदेवाची आत्महत्या 

मनोज साखरे

औरंगाबाद : लग्न लागले पण संसार फुलण्याआधीच दुसऱ्याच दिवशी डाव मोडल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. हळदीच्या अंगाने बुधवारी (ता. सहा) सकाळी उठून नवरदेवाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गाठले. त्यानंतर समोरुन आलेल्या रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही गंभीर व हृदयद्रावक घटनेनंतर हळहळ व्यक्त झाली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जीवन सोनाजी भोसले (वय 28, रा. ब्रिजवाडी, एमआयडीसी चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे. काही दिवसांपुर्वीच त्याचा पैठण तालुक्‍यातील मामाच्या मुलीसोबत विवाह जुळवण्यात आला होता. त्यानंतर सुपारी फुटली. त्यानंतर घरगुती विधी पार पडले. हळदीचा कार्यक्रमही उरकला.

मंगळवारी (ता. पाच) मुलीच्या गावी लग्न असल्याने नवरदेवासह कुटुंबिय, वऱ्हाडी मंडळी तेथे गेली. तेथे जीवनचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर नवरीला घेऊन नवरदेव व वऱ्हाडी ब्रिजवाडी येथे मंगळवारी रात्री साडे नऊला आले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. बुधवारी सकाळी हळद फेडण्यापुर्वी जीवन उठला. कुणालाही काही न सांगता तो हळदीच्याच अंगाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाकडे दुचाकीने गेला. परिसरात समोरुन येणाऱ्या धावत्या रेल्वेखाली त्याने उडी घेतली. ही बाब लक्षात येताच त्याला मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी काटकर घटनास्थळी पोचले. दरम्यान घाटी रुग्णालयात जीवनला दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT