Ladde
Ladde 
मराठवाडा

शेतकऱ्यांना गुरू मानत साजरी केली गुरुपौर्णिमा.... लातुरच्या या समाजसेविकेचे होतेय कौतुक

जलील पठाण

औसा, (जि. लातूर) : गुरुकडून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवनात आनंद आणि प्रगती होत असताना गुरू बद्दल शिष्याने ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा. पण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सगळीकडून उपेक्षित असतांना त्याला गुरू मानून त्याच्या बांधापर्यंत जाऊन त्याचे चरण स्पर्श करून ऋण व्यक्त करण्याची मानसिकता दुर्मिळच.. पण हे करून दाखविले आहे औसा शहरात राहणाऱ्या प्रियंका लद्दे या समाजसेविकेने.

त्यांनी साजरी केलेली ही आगळी वेगळी गुरू पौर्णिमा आता सर्वांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. कधी नापिकी तर कधी गारपीट तर कधी दुष्काळ, कोसळले बाजार भाव आशा संकटाला सामोरे जात बळीराजा आपली शेती कसतो आणि घाम गाळून धान्य पिकवितो म्हणून जगाला पोटभर अन्न मिळते.

पण हा शेतकरी सगळीकडून उपेक्षीला जात असताना 'तो आहे म्हणून मी आहे' अशी भावना मनात ठेवून या जगाच्या पोशिंद्याला गुरू मानून त्याची मनोभावे पूजा करून त्याला गुरू दक्षणा म्हणून शेतात लागणारी औजारे दिली ती औसा शहरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका लद्दे या महिलेने. रविवारी (ता.५) त्यांनी पन्नास शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतात काम करीत असलेले शेतकरी व त्यांना शेती कामात मदत करीत असलेल्या त्यांच्या कारभारणीची पूजा करून त्यांना वंदन केले आणि त्यांना शेतीसाहित्य गुरू दक्षणा म्हणून दिली.

श्रीमती लद्दे यांच्या या आगळ्या वेगळ्या गुरू पौर्णिमेची औसा शहरासह संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू असून त्यांचे कौतुक होत आहे. शेतात जाऊन शेतकऱ्यांची पूजा करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने अनेक शेतकऱ्यांना काय बोलावे हे कळत नव्हते. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. अनेक दुर्लक्षित सामाजिक कामे करण्यात श्रीमती लद्दे यांचा मोठा वाटा आहे. ...

जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाला आपण म्हणतो पण प्रत्यक्षात तो चोहीबाजुनी गांजला आहे. नुसती बिरुद देऊन काय उपयोग म्हणून मी यंदाची गुरू पौर्णिमा मला अन्न देत असलेल्या शेतकऱ्यांना गुरू मानून त्यांच्या शेतात साजरी करण्याचे ठरविले आणि समाजाचा एक घटक म्हणून मी त्यांची पूजा करून ऋण व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून धन्य वाटले"

- प्रियंका लद्दे. समाजसेविका औसा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT