कृषी दिन: उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाची कास धरा, डाॅ. डी. एल. जाधव

सुषेन जाधव
Wednesday, 1 July 2020

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध सुधारित तंत्रज्ञानाची कास धरावी असे आवाहन औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी केले. कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हसनाबादवाडी येथे आयोजित कृषीदिनाच्या कार्यक्रमात बुधवारी (ता.१) ते बोलत होते.

औरंगाबाद: उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध सुधारित तंत्रज्ञानाची कास धरावी असे आवाहन औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची गरज असून याद्वारे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, त्यातून शेतीतही आमूलाग्र बदल होऊ शकतो असे मत डॉ. जाधव यांनी मांडले. कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हसनाबादवाडी येथे आयोजित कृषीदिनाच्या कार्यक्रमात बुधवारी (ता.१) ते बोलत होते.

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

राज्यभरात एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा १ ते ७ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमही पूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याने सप्ताहाची शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड , श्री. जारवाल, सीईओ संतोष कवडे, छायाताई घारगे, एनएआरपीचे सहयोगी संचालक डॉ. सु. बा. पवार, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, केव्हीके प्रमूख शास्त्रज्ञडॉ. किशोर झाडे, कृषिभूषण जगन्नाथ तायडे, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसूरे, डॉ. दर्शना भुजबळ, अशोक निर्वळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा- सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश

एकात्मिक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सु. बा. पवार यांनी शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकाची अन्नद्रव्य व पाण्याची गरज ओळखून त्यानुसारच खते व पाणी द्यावे असे आवाहन केले. डॉ.किशोर झाडे यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये निंबोळी अर्काचा वापर करण्याविषयीची माहिती दिली. निंबोळी अर्क हे जवळपास सर्व किडीसाठी परिणामकारक आहे व इतर कीटकनाशकंपेक्षा खूप स्वस्त व प्रभावी असल्याचेही त्यांनी सांगतिले.

हेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय? कृषी विभागसमोरील आव्हान कायम

शेतकऱ्यांनी अतिरिक्त कार्यक्रम व कामांसाठी होणारा खर्च कमी करून तोच खर्च शेतीवर करावा जेणेकरून शेती आपणाला त्याचा मोठ्या प्रमाणात परतावा देईल, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले. रामुकाका शेळके शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी असे सांगत शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध निर्णयांची व त्याची अंमलबजावणी संदर्भात माहिती श्री. शेळके यांनी दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे गावातील पशुधनाचा लसीकरणही करण्यात आले. धर्मशिला बेडेकर यांनी आभार मानले.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krushi Din CelebratedIn Hasanabadwadi Aurangabad News