फोटो
फोटो 
मराठवाडा

‘तीन’ हजार पुस्तके वाटणारे पोटविकार तज्ज्ञ 

शिवचरण वावळे

नांदेड : डॉक्टरकडे गेल्यावर तपासणीनंतर रूग्णाच्या हाती येते ती औषध गोळ्या लिहलेली चिठ्ठी. मात्र, त्याऐवजी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला बरे होण्यासाठी पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला आणि तो पुस्तक जर मोफत कायमस्वरूपी तुम्हालाच दिले, तर आश्‍चर्य वाटायला नको. असेच एक डॉक्टर नांदेडमध्ये आहेत बर का, त्यांच्याकडे आतापर्यंत आलेल्या काही रूग्णांंसह मराठवाड्यातील तीन हजार डॉक्टरांना ‘आपले पोट आपल्या हाती’ हे पुस्तक भेट म्हणून त्यांनी दिले आहे. 
        
ग्रामीण भागातील सामान्य रूग्णास लहान-सहान आजाराला घाबरून रूग्णालयाची पायरी चढावी लागु नये व गावातील जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या कुठल्याही डॉक्टरकडे उपचारासाठी एकच रूग्ण गेल्यास तपासणीअंती सर्वांकडून एकच निदान व्हावे व योग्य वेळी योग्य सल्ला आणि उपचार मिळावेत म्हणून पोटविकार तज्ज्ञ डॉ.नितीन जोशी यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील चक्क तीन हजार डॉक्टर्सना या पुस्तकाचे मोफत वाटप केले आहे.

नेमके काय आहे या पुस्तकात 

‘आपले पोट आपल्या हातात’ हे पुस्तक मराठी भाषेतील आरोग्य विषयाला वाहिलेले एक अद्ययावत्त पोटाच्या विकार व समस्यांची ओळख, उपाय सुचवनारे पुस्तक असून, जेवनाच्या पद्धतीपासून ते किती आणि कसे जेवायचे, कोणत्या पदार्थातून कोणत्या कॅलरीज मिळतात. इतकेच नव्हे तर मद्य सेवनामुळे सुद्धा कोणत्या समस्या आजार उद्धवतात. काविळ कसा ओळखावा, पित्तशयाचे आजार, ॲसिडीटी म्हणजे नेमके काय, पोट का दुखते, शौचास गेल्यावर किती वेळ लागतो व का लागतो, अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करणारे मराठी भाषेतील हे त्यांचे एकमेव पुस्तक आहे. 
   
आठ जिल्ह्यातील डॉक्टर्सना पुस्तक भेट 

नांदेड शहर वैद्यकीय व्यवसायाने मेडीकल हब म्हणून उदयास आले आहे. आरोग्य विषयक सर्वच अत्याधुनिक वैद्यकीय उपचार शहरात मिळतात. त्यामुळे इथे नांदेडसह, परभणी, हिंगोली, वाशिम, तेलंगणा व सिमावर्ती भागातील रूग्ण इथे उपचारासाठी दाखल होतात. शासकीय व खासगी रूग्णालयातील गर्दीमुळे डॉक्टर्सकडे स्वतःसाठी देखिल वेळ शिल्लक नसतो. इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्णालयात गर्दी झालेली असते. असे असताना देखिल डॉ.नितीन जोशी या पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वतः ‘आपले पोट आपल्या हाती’ नावाचे पोटाच्या संपूर्ण विकाराची अद्ययावत माहिती देणारे आणि तेही मराठी भाषेतील पहिलेच पुस्तक लिहून त्याचे मराठवाड्यातील डॉक्टर्सना त्यांच्या सहकाऱ्यामार्फत घरपोच किंवा त्या डॉक्टर्सच्या रूग्णालयात जावून हे पुस्तक भेट दिले आहे.

उपचारासाठी पुस्तक उपयोगी

पूर्वी डॉक्टरी पेशाकडे सेवाभाव या हेतुने बघितले जात असे. परंतु, जसजसे वैद्यकीय क्षेत्राच्या कक्षा रूंदावत गेल्या तस तशा या क्षेत्रातील वैद्यकीय शिक्षणावर होणारा खर्च हा कोटीच्या घरात जाऊन पोहचला आहे. त्यामुळे साहजिकच वैद्यकीय पेशातील सेवाभाव केव्हाच गळुन पडला आहे. आणि त्याची जागा आता व्यवसायाने घेतली आहे. त्यामुळे रूग्णालयाची पायरी चढणाऱ्या प्रत्येक रुग्णास किंमत मोजावी लागते. असे असले तरी, यातील बहुतेक रूग्णास काहीच झालेले नसते त्यांच्या मनात एखाद्या आजारा बद्दल शंका उपस्थित होते आणि पुढे हिच शंका त्यांना कवेत घेते. कुठलाही आजार नसणाऱ्या रूग्णाच्या रूग्णालयात अनेक तपासण्या होतात. गोळ्या औषधी घेतल्या तरी, रूग्ण बरा होत नाही. आणि एक दिवस गोळ्या खावून त्याच्या शरिरावर गोळ्यांचा दुष्परिणाम होतो आणि दुसराच आजार बळावतो. तेव्हा मुख्य आजारावर उपचार करण्याची वेळ निघुन गेलेली असते. तेव्हा मात्र डॉक्टर्ससुद्धा काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे अशी परिस्थिती सामान्य रूग्णावर ओढावू नये म्हणून सर्व डॉक्टर्सना हे पुस्तक भेट देण्यात 
-डॉ. नितीन जोशी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT