pune.jpg
pune.jpg 
मराठवाडा

दिव्यांग कल्याण धोरण लवकरच जाहीर करणार : सामाजिक न्यायमंत्री

सकाळवृत्तसेवा

लातूर : ''सामाजिक न्याय विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्यावतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगाना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार असून या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतील.'', असे प्रतिपादन सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी केले. दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राज्य दिव्यांग कल्याण धोरण जाहीर करणार आहे, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

संवेदना बहुविकलांग केंद्र येथे राष्ट्रीय बहुदिव्यांगता जनसशक्तीकरण संस्था (चेन्नई), जनकल्याण समिती (पुणे), अधिवक्ता परिषद (लातूर) आणि सक्षम नागपूर यांच्यावतीने आयोजित दिव्यांग व्यक्ती समानहक्क, समान संधी कायदा: 2016  यावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, राष्ट्रीय  बहुदिव्यांगता संस्थेचे संचालक हिमांशू दास, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, डॉ. अशोक कुकडे उपस्थित होते.

बडोले म्हणाले, ''कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने दिव्यांगाना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दिव्यांगाना विविध साहित्य पुरवठा करणे आणि त्यांच्यासाठी योजना आखणे याबरोबरच समाजात दिव्यांग व्यक्ती निर्माण होऊ नये याकरिता शिघ्र हस्तक्षेप केंद्र सुरु केली जाणार असून लातूरसाठीही एक केंद्र मंजूर करत आहे. राज्यातील एकही दिव्यांग व्यक्ती दिव्यांगतत्व प्रमाणपत्राच्या अभावी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये याकरिता झिरो पेंडन्सी हा उपक्रम प्रशासनाने हाती घ्यायला हवा.''
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT