Beed Rain
Beed Rain 
मराठवाडा

मराठवाड्यात जोरदार पाऊस; एकाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

उस्मानाबाद- मराठवाड्यातील लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला असून, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तिन्ही जिल्ह्यात आज (शुक्रवार) मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. शिवाय, उमरगा, तुळजापूर, लोहारा तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पाटोदा तालुक्यातील जवळाला येथे नदीत एक जण वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरू आहे. परंडा, भूम तालुक्यातील अनेक छोट्या नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. सीना कोळेगावसह अनेक धरणांत अनेक वर्षांनंतर पाणीसाठा होऊ लागला आहे. उमरगा, तुळजापूर, लोहारा तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बीड शहर परिसरातही आज (शुक्रवार) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे. बीड शहरात 81 मिली पाऊस पडला आहे. माजलगाव व आष्टी तालुक्यांतही मुसळधार पाऊस सुरू आहे. लातूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मांजरासह तिच्या उपनद्यांना चांगले पाणी आले आहे. निलंगा तालुक्यातही नदीला पूर आला आहे. मराठवाड्यातील या तिन्ही दुष्काळग्रस्त जिल्ह्यात परतीच्या पावसाचे शेवटच्या टप्प्यात जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. मात्र, गरजेच्या वेळी पाऊस न पडल्याने पिके वाया जात आहेत.

परंडा (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील पांढरवाडी प्रकल्प भरल्याने तो ओसंडून वाहत आहे. या पावसाने सीना कोळेगावसह तालुक्यातील प्रकल्पांत अनेक वर्षांनंतर पाणीसाठा होत आहे. माजलगाव धरण मृत साठ्याच्या बाहेर आले. धरणात 58858 क्युसेक/सेकंद पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणीपातळी 426.20 झाली असून एकुण साठा 145 द.ल.घ.मी झाला आहे. धरणात 3 द.ल.घ.मी. उपयुक्त साठा झाला असून, पाण्याची आवक सुरूच आहे. पाटोदा परिसरात रात्री पासून मुसळधार पाऊस पडला आहे. 15 वर्षांनंतर एवढ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील बाजारतळ पाण्यात तर साळ नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

कोळगाव प्रकल्पात झपाट्याने वाढ होवू लागली आहे. मांजरा धरणात सकाळी अकरा वाजेपर्यंत 23 द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. उद्यापर्यंत 35 द.ल.घ.मी. होईल, असा अंदाज अभियंता अनिल मुळे यांनी व्यक्त केला आहे. 

नदीत वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
पाटोदा तालुक्यातील जवळाला येथे नदीत एक जण वाहून गेल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली असून, थोड्या अंतरात त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. व्यक्तीचे नाव त्रिंबक साहेबराव केकान असून वय अंदाजे 50 वर्षे आहे. नदीला पुर आल्यामुळे माजलगाव तालुकयातील गव्हाणथडी या गावचा संपर्क तुटला आहे. मांजरा धरणात २१.७३५ दलघमी पाणी जमा झाले आहे. बीड, केड, कळंब परिसरातील पावसान् मांजरा, बिंदुसरा या नद्या दुथडी भरून वाहताहेत. 

बीड जिल्ह्यात ५५.४ मि.मी. सरासरी पावसाची नोंद; केज सर्कलमध्ये सर्वाधिक ११० मि.मी. पाऊस!
बीड जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासात ५५.४ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

SCROLL FOR NEXT