Truck
Truck 
मराठवाडा

अवजड वाहन लायसन्स चाचणीप्रक्रिया बंद

अनिल जमधडे

औरंगाबाद - केंद्र शासनाने ‘अवजड वाहन प्रशिक्षण’ पद्धतीत बदल केला आहे; मात्र यासाठीची यंत्रणाच उपलब्ध नसतानाही अवजड वाहन परवाना (लायसन्स) चाचणी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आरटीओला अचानक जाग आल्याने, शिकाऊ परवाना काढलेल्या हजारो उमेदवारांना मनस्ताप झाला आहे. 

केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने १५ मे २०१८ ला ‘अवजड वाहन प्रशिक्षण’ पद्धतीत बदल केला आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षकाला ‘इंधन कार्यक्षमता चाचणी’ आवश्‍यक केली आहे. प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम राज्याच्या आरटीओंकडे आलेला नाही.
 त्यामुळे आतापर्यंत ड्रायव्हिंग स्कूलमार्फत पूर्वीच्याच पद्धतीने प्रशिक्षण दिले जात होते, तर आरटीओ कार्यालयही वाहन परवाने देत होते. 

अचानक आली जाग 
नवीन अभ्यासक्रमात प्रशिक्षक चालकाला इंधन कार्यक्षमता चाचणी आवश्‍यक आहे. त्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांना इंधन कार्यक्षमता मोजण्याचे योग्य उपकरण बसविण्याचे सांगण्यात आले; मात्र तीन महिन्यांपूर्वीच्या परिपत्रकाची माहिती अचानक ड्रायव्हिंग स्कूलला दिली.

त्याचप्रमाणे तातडीने अवजड वाहन अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी थांबवली. विशेष म्हणजे योग्य उपकरण म्हणजे काय हे स्पष्ट केले नसल्याने, संभ्रम निर्माण झाला आहे. 

अवजड वाहन परवानासाठी (अनुज्ञप्ती) प्रशिक्षण पद्धतीत बदल केला आहे. नवीन बदलानुसार प्रशिक्षण सुरू होईपर्यंत पक्का परवाना चाचणी बंद ठेवण्यात आली आहे. 
- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 

आरटीओ कार्यालयाने अचानक अभ्यासक्रम बदलल्याचे सांगत चाचणी बंद केली. आमच्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सहा महिने मुदतीचे शिकाऊ परवाने काढून ठेवलेले आहेत. त्यांना पक्का परवाना दिला पाहिजे. नवीन प्रणालीसाठी मुदत दिली पाहिजे. 
- अनिल घोरपडे, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालक 

अशी आहे अपेक्षा 
 इंधन कार्यक्षमतेच्या चाचणीसाठी व  प्रशिक्षणासाठी एक दिवस असावा
 इंधन कार्यक्षमतेसाठी वर्गप्रशिक्षण देण्यात यावे
 प्रशिक्षण कालावधीत इंधन कार्यक्षमतेची चाचणी पाच किलोमीटर ट्रॅकवर घ्यावी
 मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांना इंधन कार्यक्षमता मोजण्यासाठी योग्य ते उपकरण बसवावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT