Crop Loan
Crop Loan Crop Loan
मराठवाडा

हिंगोली : केवळ सात टक्केच पीककर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात ८१० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ सात टक्केच कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात आता खरीप हंगाम काहीच दिवसांवर आला आहे. त्यामुळे बँकांनी पीककर्ज वाटपाला गती देणे आवश्यक झाले आहे.

यावर्षी खरीप हंगामात ८१० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला १३९ कोटी रुपये, राष्ट्रीयकृत बँकेला ५२१ कोटी रुपये तर मराठवाडा ग्रामीण बँकेला १४९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. एप्रिल व मे महिन्याच्या अखेरपर्यंत पीककर्ज वाटप होणे अपेक्षित होते. यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदीसाठी करणे सोयीचे झाले असते. परंतु, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सात टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे.

जिल्ह्यातील पीककर्ज वाटप परिस्थिती लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच बँकांना कडक इशारा दिला. बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटप न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनीही पीककर्ज वाटपच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे बँकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता पन्नास टक्के तरी पीककर्ज वाटप होईल की नाही याची शंका आहे. गतवर्षी लोकप्रतिनिधींनी पीककर्ज वाटप बाबत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. त्यावेळीही आंदोलनाचे इशारेही दिले होते. मात्र, बँकांनी या विषयांकडे दुर्लक्ष करून केवळ सहा टक्केच कर्ज वाटप केले.

असे झाले वाटप

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ५,५६७ शेतकऱ्यांना २१.१८ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत बँकेकडून २,०७२ शेतकऱ्यांना २२.२० कोटी रुपये तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून १,५५४ शेतकऱ्यांना १३.५५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. बँकेकडून पीककर्ज वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्टपूर्ण होण्याची आशा मावळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT