Hingoli villagers agitation for Zilla Parishad school teacher vacancies
Hingoli villagers agitation for Zilla Parishad school teacher vacancies sakal
मराठवाडा

हिंगोली : शिक्षकांची रिक्त पदे भरा, म्हणत ग्रामस्थ आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

आखाडा बाळापूर : येलकी येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेमध्ये मागील तीन वर्षांपासून दोन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सोमवारी ग्रामस्थांनी रिक्त पदे भरा, अन्यथा शाळा सुरु करू देणार नाही, असा पवित्रा घेत शाळेचे कुलूप उघडू दिले नाही. शेवटी गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे यांनी लवकरच शिक्षकांची रिक्त पदे भरुत, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी शाळा उघडून दिली.

अधिक माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये इयत्ता सातवीपर्यंत वर्ग आहेत. एकूण विद्यार्थी संख्या १०१ आहे. येथे सात शिक्षकांची मान्यता आहे, त्यापैकी पाच शिक्षक शाळेवर असून, इतर दोन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्यात आले नाहीत, म्हणून सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थ व पालकांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेच्या पहिल्याच दिवशी कुलूप उघडू दिले नाही. या विषयी गट शिक्षण अधिकारी दत्ता नांदे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी ३० जूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्याचे पोर्टल सुरू होणार आहे. त्यामध्ये आपणास शिक्षक येईल, असे उत्तर दिले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप देशमुख, रणजित मोरे, अमोल पतंगे, गजानन पतंगे, देवराव चौतमल, नितीन पतंगे, दीपक देशमुख, भारत देसाई, साजेद खान पठाण, इब्राहिम पठाण, मनोज पतंगे, संदीप पतंगे, गोविंद शिंदे, धम्मापल रणवीर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT