Shekhar-Channe
Shekhar-Channe 
मराठवाडा

देशात ऑक्‍टोबरपासून हायटेक वाहन परवाना

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार परिषदेत दिली.

सध्या प्रत्येक राज्यांत वेगवेगळ्या पद्धतीचे वाहन परवाने दिले जातात. त्यातही अनेक परवाने बोगस असल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्राने देशभरात एकाच पद्धतीचे ‘हाय सिक्‍युरिटी स्मार्ट कार्ड’ ही संकल्पना आणली आहे. या संदर्भात केंद्राने ३० ऑक्‍टोंबर २०१८ ला निर्णयही घेतला होता. त्यानुसार येत्या एक ऑक्‍टोबरपासून ‘हाय सिक्‍युरिटी स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. 

परिवहन विभागातर्फे ११० सेवा ऑनलाइन देण्यात येत आहेत. ऑनलाइन प्रणालित मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आहेत. राज्यात वाढत्या अपघाताच्या अनुषंगाने स्वतंत्र ‘रोड सेफ्टी सेल’ सुरू केला आहे. त्याअंतर्गत अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात १३४८ अपघातप्रणव क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) असून, त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. अपघातांच्या अनेक कारणांवरही विचार केला जात आहे. या उपाययोजनांचे चांगले परिणाम वर्षभरानंतर दिसतील असा आशावाद चन्ने यांनी व्यक्त केला. दरम्यान, पक्का वाहन परवान्यासाठी रस्त्यावर चाचणी घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा उमेदवार हा परिपूर्ण असला पाहिजे, म्हणूनच रस्त्यावर चाचणीचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘क्‍यूआर कोड’चे कोडे!
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘क्‍यूआर कोड’ लावण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरण समितीने घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद शहरात रिक्षांमध्ये ‘क्‍यूआर कोड स्टीकर्स’ लावण्यात येत आहेत; मात्र ‘क्‍यूआर कोड स्टीकर्स’ काय आहेत, असा प्रतिसवाल परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी पत्रकारांना केला. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी बाजू सावरत परिवहन विभागाच्या सूचनेनुसारच ‘क्‍यूआर कोड स्टीकर्स’ सुरू केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT