file photo
file photo 
मराठवाडा

बागायतदार शेतकरी त्रस्त : संत्रा व मोसंबी पीकांवर हे आले गंडातर

गणेश पांडे

परभणी ः परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात फळबागावर पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली असून पाने खाणाऱ्या अळीसोबतच सिट्रस सायला किडींचा प्रादुर्भाव देखील झाला असल्याची माहिती विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली.

सध्यस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन नवती फुटत असुन मोठ्या बागांना मृगबहाराची फुलधारणा होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या फळपिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे यांनी जांब, मांडाखळी, सोन्ना, पेडगाव, मानवत (जि. परभणी) आदीं ठिकाणी शेतक-यांच्‍या फळबागाची पाहणी केली असता मोसंबी व संत्रा पिकावर पाने खाणारी अळी (लेमन बटरफ्लाय) व सिट्रस सायला या कीडीचा   प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळुन आला आहे.

याचे पतंग काळया पिवळया आकर्षक रंगाचे असतात

पाणे खाणाऱ्या अळीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटीकेत होतो. याचे पतंग काळया पिवळया आकर्षक रंगाचे असतात. लहान अळया तपकिरी रंगाच्या व त्यावर पांढरे ठिपके असतात, त्यामुळे त्या पक्षाची विष्ठा पडल्यासारख्या दिसतात. मोठ्या अळया हिरवट रंगाच्या असतात. या अळ्या कोवळी पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पर्णविरहीत दिसते.

कसे करावे व्यवस्थापन

अंडी, अळया व कोष हातांनी गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून मारणे. झाड हालवून खाली पडलेल्या अळया वेचून नष्ट करणे. बागेतील अथवा आजुबाजूस असलेले बावची या तणाचा बंदोबस्त करावा. तसेच मित्र कीटक जसे ट्रायकोग्रामा, अपेन्टेलस, कॅरोप्स, ब्रॅचीमेरीया, टेरोमॅल्स आदींचे संवर्धन करावे. तसेच बॅसिलस थुरीनजिएन्सीस (बीटी) पावडरची प्रति दहा लिटर पाण्‍यात २० ग्रॅम याप्रमाणे मिसळुन फवारणी करावी. किंवा क्विनालफॉस २० ईसी ३० मि. ली. किंवा थायोडीकार्ब ७० डब्लुपी १० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला तज्ञानी दिला आहे. सिट्रस सायला कीड या किडीचा प्रौढ पिवळसर करडया रंगाचा असतो. पंखाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. पिल्ले मळकट रंगाची असतात. या किडींचे पिल्ले कवळी पाने व फांद्या यातुन रसशोषण करतात. त्यामुळे कवळी पाने व कळयांची गळ होते व त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

सिट्रस सायला कीडीचे व्यवस्थापन असे करावे

या कीडीचे पर्यायी खादय वनस्पती (कडीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये असु नये. पिवळया चिकट सापळयाचा वापर करावा. ढालकिडा, क्रायसोपा, सिरफीड माशी, टॅमरॅक्सीया रॅडीयाटा आदी मित्रकीडीचे संवर्धन करावे. तसेच इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 1 मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम 25 डब्ल्यु जी 1 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून नवती फुटण्याच्या वेळी म्हणजे जुन-जुलै मध्ये सायलाचा प्रादुर्भाव दिसताच करावा. गरज पडल्यास पंधरा दिवसाच्या आंतराने दुसरी फवारणी करावी, परंतु कीटकनाशक बदलुन वापरावे असे आवाहन विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT