मराठवाडा

पत्नी आणि मुलीला विष पाजून पतीची गळफास लावून आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

बीड : ऐन दिवाळी सणाच्या पाडवा या नववर्षाच्या रात्री त्रासामुळे होणाऱ्या तणावातून अगोदर पत्नी आणि मुलीला विष देऊन पतीने झालंड गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहरातील संत नामदेव नगर भागात घडली. मृत्यपूर्व चिट्ठीत काही लोकांचा त्रास होत असल्याचा उल्लेख आहे.

योगेश शिंदे (वय 32), शीतल शिंदे (वय 28) व श्रावणी (वय 05) अशी या तिघांची नावे आहेत. संत नामदेव नगर भागातील रहिवाशी योगेश शिंदे हा खासगी वाहन चालक होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याचे दिसत होते. त्यामुळे तो नेहमी शांत असे. दरम्यान, शिंदे कुटुंब पाच दिवसांपासून सासुरवाडीत राहत होते.

गुरुवारी (ता.08) रात्री तिघेही आपल्या घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री हे कृत्य केले. अगोदर पत्नी शीतल आणि मुलगी श्रावणी या दोघींना विष देऊन नंतर योगेशने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिस पंचनाम्यात त्याच्या खिशात मृत्यूपूर्व चिट्ठी सापडली असून त्यामध्ये काही नावे लिहून त्यांच्याकडून त्रास होत असल्याचा उल्लेख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT