File Photo 
मराठवाडा

आईस्क्रीममध्ये सॅकरिन अन्‌ धुण्याच्या सोड्याचा उपयोग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आबालवृद्धांच्या अतिशय आवडत्या आईस्क्रीममध्ये वनस्पती तूप, सॅकरिन आणि चक्क धुण्याचा सोडादेखील मिसळला जातो, हे तुम्हाला माहिती आहे काय? आपण जे आईस्क्रीम खातो, ते किती चांगले आहे आणि किती विषारी आहे, ते आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे आईस्क्रीम खाताना जागरूक राहिले पाहिजे. 

उन्हाळ्यात तर सगळे आईस्क्रीमवर तुटून पडतातच; पण हल्ली वर्षभर चालणारी कित्येक आईस्क्रीम पार्लर्स शहरात उघडली आहेत. मोठ्या कंपन्यांबरोबरच शहरात छोट्या-छोट्या कारखान्यांतूनही विविध प्रकारचे आणि कित्येक फ्लेवर्सचे आईस्क्रीम बाजारात आलेले दिसते. काही दिवसांपूर्वी मुंबईत माटुंगा आणि वडाळा येथे भेसळयुक्त तेलाच्या आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य अन्न व औषध विभागाने धाड टाकली होती. त्यात स्ट्रॉबेरी आईस्क्रीम मिडियम फॅट, व्हॅनिला आईस्क्रीम मिडियम फॅटचे नमुने आणि भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले होते. 

दुधाच्या मलईपेक्षा वनस्पती तूप स्वस्त आहे आणि मलईपासून बनवलेले आईस्क्रीम्स सर्वसाधारण तापमानात जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या अनेक भागांत काही बोगस कंपन्यांनी दुधाऐवजी वनस्पती तूप मिसळलेल्या आईस्क्रीमचा पुरवठा केल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. खरे आईस्क्रीम आणि वनस्पती तूप मिक्‍स केलेले आईस्क्रीम यांच्यात फारसा फरक ओळखता येत नसल्याने ग्राहक या आईस्क्रीमला बळी पडतात. हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे डॉक्‍टर्स सांगतात. 

थंडगार आईस्क्रीम खाताना आपल्याला त्यातल्या भेसळीची चव चटकन कळणे शक्‍य नसते. पण वेगवेगळे फ्लेवर्स आणि काही खाद्यपदार्थांचा वापर या बनावट आईस्क्रीममध्ये केला जातो. त्या फ्लेवर्समुळेही मलईमिक्‍स आहे, की वनस्पती तूपमिक्‍स हे सहज कळत नाही. चवदार आईस्क्रीम खाण्याच्या नादात आपण डालडा खात आहोत, हे मोठ्यांनाही कळत नाही, तर लहान मुलांना कसे कळणार? 

जास्त दिवस टिकण्यासाठीच भेसळ 

  • दुधाच्या मलईपासून बनवलेले आईस्क्रीम जास्तीत जास्त महिनाभर टिकते. नंतर ते खराब होते. 
  • दुधाच्या खऱ्या आईस्क्रीम साठवणुकीसाठी अखंड वीजपुरवठा असावा लागतो, जो आपल्याकडे सततच्या लोडशेडिंगमुळे अशक्‍य आहे. 
  • खऱ्या आइस्क्रीमची वाहतूक करण्यासाठी वातानुकूलित वाहनाची गरज असते. 
  • वनस्पती तुपापासून बनविण्यात येणाऱ्या बनावट आईस्क्रीमला यापैकी काहीच लागत नाही. 
  • वर्षभर ठेवले तरी ते खराब होण्याचा धोका नसतो. 
  • स्वस्तातला कच्चा माल, कमी वाहतूक खर्च आणि अधिक नफा यामुळेच भेसळ होते. 

कशी ओळखणार भेसळ? 

  • आईस्क्रीममध्ये धुण्याची पावडर मिसळलेली असेल तर लिंबाचे काही थेंब त्यात टाकल्यास बुडबुडे येतात. धुण्याची पावडर नसेल तर बुडबुडे येत नाहीत. 
  • साखरेऐवजी आईस्क्रीममध्ये सॅकरिन मिसळले असेल, तर चवीवरून ते ओळखता येते. सॅकरिनची गोड चव जिभेवर रेंगाळते; पण काही वेळातच जिभेला कडसर लागते. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT