मराठवाडा

शर्टवरील टेलरच्या नावावरून पटली ओळख 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - डोक्‍याचा फेटा गळ्यात घालून छावणी येथील उड्डाणपुलालगत एका झाडाला गळफास घेतलेल्या तरुणाची ओळख चार दिवसांनंतर पटली. विशेषत: त्याच्या शर्टवरील टेलरच्या नावावरून पोलिसांनी टेलरचा आणि नंतर नातेवाइकांचा शोध घेतला. ही घटना छावणी परिसरात अकरा जुलैला घडली होती. 

आकाश प्रतापसिंग डोभाळ (वय 34, रा. बनेवाडी) असे मृताचे नाव आहे. तो दूध विक्री करीत होता. त्याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. बनेवाडीत तो भावासह राहत होता. 

छावणी उड्डाणपुलाच्या बाजूला कडुनिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याची बाब अकरा जुलैला उघडकीस आली. त्यानंतर सायंकाळी छावणी पोलिसांनी आकाशचा मृतदेह ताब्यात घेत घाटी रुग्णालयात नेला; परंतु त्याची कसलीच ओळख पटत नव्हती. पोलिसांनी शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात बेपत्तांची माहिती मिळविली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शर्टवरील लेबलवरून टेलरचा शोध घेतला. त्यावेळी टेलरची माहिती मिळाली. पोलिसांनी आपण सुरक्षारक्षकांचे कपडे तयार करून दिले होते. त्यापैकी काही सुरक्षारक्षक एका रुग्णालयात कामाला असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सुरक्षारक्षकांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला. त्यांना आकाशचा फोटो दाखवला. व्यवस्थापकाने त्याला ओळखत नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांची पंचाईत झाली होती. 

सुरक्षारक्षकांनी  पटविली ओळख 
मृत व्यक्तीला ओळखत नसल्याचे त्याने सांगितले; परंतु मृताच्या अंगावरील शर्ट आपल्याच सुरक्षारक्षकाचा असल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे इतर तीन ते चार सुरक्षारक्षकांना बोलाविण्यात आले असता त्यांनी झाडाला लटकलेल्या अवस्थेतील फोटो पाहताच त्यातील एकाने आपण त्याच्या भावाला हा शर्ट दिल्याचे सांगितले. 

बेपत्ता होता; पण तक्रार दिली नव्हती 
भावाचाच शर्ट आकाशने परिधान केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आकाशच्या भावाचा शोध घेतला. त्यावेळी आकाश चार दिवसांपासून बेपत्ता होता; पण पोलिस ठाण्यात तक्रार आम्ही दिली नाही, असे त्याच्या भावाने सांगितले. आकाशने आत्महत्या केल्याचे सांगताच भावाला अश्रू अनावर झाले. आत्महत्येचा तपास छावणी ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT