police
police 
मराठवाडा

'लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा'

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा, तसेच आदर्श आचार संहिता पाळा असे आवाहन करत कायदाव व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सांगितले. यावेळी एसपी संजय जाधव हे उपस्थित होते. 

विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी शनिवारी (ता. १६) दुपारी चार वाजता पोलिस अधिक्षक कार्यालयातील चीतन सभागृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली. लोकसभा निवडणूकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून कुठल्याही क्षणी आम्ही बंदोबस्त करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. परिक्षेत्रातील पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल माहिती घेतली. या निवडणुकीसाठी तीन पोलिस अधिक्षक, १५ पोलिस उपाधिक्षक, ३१५ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि फौजदार, ३९ पोलिस निरीक्षक यांच्यासह तीन हजार २४ पोलिस कर्मचारी, तीन हजार गृहरक्षक दलाचे जवान, सीआयएसएफ आणि एसआरपीएफच्या प्रत्येकी तीन अशा सहा कंपन्या तैणात करण्यात येणार आहेत.

निवडणूका भयमुक्त वातावरणात पार पडलण्यासाठी मतदारांनी कुठल्याच आमिषाला बळी पडु नये असे आवाहनही त्यांनी केली. जवळपास ९० टक्के पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  सिमावर्ती भागात नाकाबंदी सुरू केली असून कुठलाही गैरप्रकार चालु देणार नाही. तसेच मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडून मतदान करावे. विधानसभा निहाय तीन भरारी पथकांची नेममुक केली आहे. नांदेड रेंजमध्ये आचारसंहितेचे पाच गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत परिक्षेत्रात १३२ आचारसंहितेचे गुन्हे दाखल होते. त्यात नांदेडला ४८ गुन्हे दाखल झाले होते. संवेदनशिल मतदान केंद्रावर किंवा भागात चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. रेंजमधील सराईत गुन्हेगारांवर करडी नजर असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT