Selu News
Selu News esakal
मराठवाडा

Parbhani : सेलूत अनाधिकृत १४ गाळ्यांना नगरपालिकेने ठोकले सील

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पूतळा ते नगरपालिका रस्त्यावरील वसंतराव खारकर काॅम्प्लेक्सवरील दूसर्‍या मजल्यावरील अनाधिकृत १४ गाळ्यांना नगरपालिका प्रशासनाने सोमवारी (ता.१७) रोजी सील ठोकले. मागील अनेक दिवसांपासून शहरातील या मुख्य रस्त्यावरील वसंतराव खारकर काॅम्प्लेक्समधील दूसर्‍या मजल्यावरील नवीन १४ गाळ्यांचे बांधकाम सूरू होते. रविवार रात्रीच्या वेळी संबधित गाळ्यांना लोखंडी शटर बसविण्याचे काम सूरू होते. आयुक्तांनी या जागेवर कूठल्याही प्रकारचे काम करू नये अशी स्थगिती दिली होती. मात्र असे असतांना (Parbhani News) या ठिकाणी काम सूरू होते. सदरील जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे. असे असतांनाही नगरपालिका (Selu) प्रशासनाचा आदेश संबधित गाळधारक मानायला तयार नाहीत. मागील अनेक महिन्यांपासून या जागेवर बांधकाम होत असतांना पालिका प्रशासन काय करते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Illegal 14 Shops Sealed In Selu By Municipal Council)

शहरात अनेक मुख्य रस्ते हे अतिक्रमणाच्या विळख्यात आले आहेत. नगरपालिका प्रशासन नेमके काय करत आहे? हे समजायला तयार नाही. अतिक्रमणधारक पालिकेच्या कूठल्याही परवानगीशिवाय आपले दूकाने ठाण मांडून बसले आहेत. या अतिक्रमणधारकांवर पालिका प्रशासन का कार्यवाही करत नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र पालिकेने उशीरा का? होईना या अनाधिकृत गाळ्यांचे काम बंद पाडले ही कार्यवाही मुख्याधिकारी निलेश सुंकेवार नितीन गरूडकर, नितीश शिजाते, सुरेश भांडवले, मलिकार्जून स्वामी, रामराव पवार यांनी केली.

पालिकेची परवानगी नाही

शहरातील वसंतराव खारकर काॅम्प्लेक्सवरील दूसर्‍या मजल्याच्या कामास आयूक्तांनी स्थगिती दिली. तसेच संबंधित गाळेधाराकांनी पालिकेची कूठलीही परवानगी बांधकामासाठी घेतली नसल्याने सदरील १४ गाळ्यांना सील ठोकले असून संबंधित गाळेधारकांवर पालिका योग्य कार्यवाही करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT