parbhani
parbhani sakal
मराठवाडा

Parbhani News : पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा

सकाळ वृत्तसेवा

सेनगाव : तालुक्यातील बन बरडा, ब्रह्मवाडी, चिखलागर परिसरातून पूर्णा नदी वाहते. या पूर्णा नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी रोज हजारो ब्रास बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. शासनाकडून कुठलेही टेंडर काढण्यात आलेले नसताना. बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. मात्र महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सेनगाव तालुक्यातील बन बरडा, ब्रह्मवाडी, चिखलागर परिसरातून पूर्णा नदीचे पात्र वाहते. आणि याच पूर्णा नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूची चोरी होत असल्याचे चित्र आढळून आले आहे.

शासनाच्या परवानगीविना रोज हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे. टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.

त्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा महसूल विभागाच्या संमतीने सुरू आहे कि काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

भरधाव वेगाने वाळू वाहतूक

चिखलागर व ब्रह्मवाडी परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू चोरी करत असलेले टिप्पर हे मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत आहेत. या प्रकारामुळे रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांना अपघाताचे आमंत्रण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. प्रशासन कारवाई करतील या भितीपोटी वाळू माफियांकडून भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे महसूल विभाग, पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा प्रकार थांबवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT