army
army sakal
मराठवाडा

जवानाला अश्रूनयनाने अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड (जि.परभणी) : तालुक्यातील पांढरगाव येथील विष्णू बडे हे भारतीय सैन्य दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. सिकंदराबाद येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यामुळे गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली.

पांढरगाव येथील विष्णू व्यंकटराव बडे (३८) हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद येथे हवालदार पदावर कार्यरत होते. डेंगी या आजारामुळे त्यांचा उपचारादरम्यान (ता.८) सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. (ता.९) सप्टेंबर रोजी संत जनाबाई शाळेजवळील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंतयात्रेत शालेय विद्यार्थी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा दरम्यान देशभक्तीपर गीत व तिरंगा झेंड्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी सैन्य दलातील दोन अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. परभणी पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सैनिक संघटनेच्या सर्व माजी सैनिकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यविधीच्या वेळी हजारो उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विष्णू बडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. विष्णू बडे यांचा मृत्यू झाल्याबद्दल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT