devgiri
devgiri 
मराठवाडा

देवगिरी किल्ला : देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय साकारले 

सकाळवृत्तसेवा

दौलताबाद : भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर पुरातन तोफांचे भव्य संग्रहालय साकारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्‌घाटन भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रादेशिक संचालक एम. नंबीराजन यांच्या हस्ते शनिवारी (ता. 27) करण्यात आले. 

ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या चौहोबाजूंनी मोठमोठ्या तोफा संरक्षणाच्या दृष्टीने ठेवण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने चौदा टन वजनी मेंढा तोफ, दुर्गा तोफ यांचा समावेश होता. यासह किल्ल्याच्या सात तटांवर, प्रत्येक बुरुजावर मोठमोठ्या तोफा ठेवण्यात आल्या होत्या. कालांतराने त्या तटबंदी ढासळत चालल्याने व मनुष्यबळाअभावी त्यांचे संरक्षण होत नसल्याचे पुरातत्त्व विभागाच्या लक्षात आले. त्यांनी या सर्व तोफा जमा करून किल्ल्यातील भारतमाता मंदिराच्या पाठीमागे एका भव्य तोफांच्या संग्रहालयाची निर्मिती केली असून, त्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पुरातन तोफा बघण्याची पर्वणी पर्यटकांना लाभणार आहे.

हे भारतातील पहिले खुले तोफ संग्रहालय असून, किल्ल्याच्या परिसरात असलेल्या तोफा पर्यटकांच्या पाहण्यात याव्यात व ऐतिहासिक क्षणाची अनुभूती त्यांना व्हावी, यासाठी हा एक प्रयत्न आहे, असे एम. नंबीराजन यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील चार आदर्श स्मारकांत ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याची निवड झाली असून, त्यादृष्टीने संवर्धनाची कामे सुरू आहेत. आदर्श स्मारकाला शोभेल असे हे संग्रहालय आम्ही स्थानिक ग्रामस्थ व प्रशासन यांच्या सहकार्याने सुरू केले आहे, अशी माहिती औरंगाबाद विभागाचे अधीक्षक डॉ. दिलीप खमारी यांनी दिली. उपअधीक्षक (अभियंता) जी. भगवान सारथी, आनंद तीर्थ, किशोर चलवादी, संजय रोहणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT