मराठवाडा

महिन्यातील 25 दिवस अपायकारक! 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढणे या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला. आपल्यालाही भविष्यात शुद्ध हवा मिळवायची असेल, तर अशा उपाययोजना गरजेच्या आहेत. 

एका अहवालानुसार मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्याचवेळी महाराष्ट्रातील 17 शहरांना प्रदूषित हवेचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार पुणे, बदलापूर, उल्हासनगर येथील हवेत नायट्रोजन डायऑक्‍साइडचे प्रमाण अधिक आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर ही चार शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत, असाही अहवालात उल्लेख आहे. 

एअर क्वॉलिटी इंडेक्‍सनुसार औरंगाबादेतील हवा तब्बल 25 दिवस आरोग्याला अपायकारक आढळली आहे. धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाणही वाढते असून, निम्मा महिना त्याचे प्रमाण "सेफ झोन'वर होते. चार हजार कंपन्यांच्या औरंगाबादेत दहा लाखांवर वाहने आहेत. येथील हवेची गुणवत्ता आणि त्याच्या आकडेवारीचा गोषवारा तपासणीसाठी घेतला असता, औरंगाबाद शहराची हवा महिन्यातील एकतीसपैकी तब्बल 26 दिवस खराब आढळली आहे. एअर क्वॉलिटी इंडेक्‍सनुसार, सर्वोत्तम असलेल्या 0-50 दरम्यानच्या स्वच्छ हवेचा एकही दिवस औरंगाबादेत नव्हता; मात्र, 100 ते 150 आणि 151 ते 200 हे गट धोकादायक आणि हवा अशुद्ध असल्याचे प्रमाण देतात. या गटात औरंगाबादचा एअर क्वॉलिटी इंडेक्‍स हा 14 वेळा 101 ते 150 दरम्यान राहिला. 150 ते 200 हा गट सर्वांसाठीच धोकादायक असून, (24 मे) एका दिवशी दोनशेची हद्द ओलांडून येथील एअर क्वॉलिटी इंडेक्‍सने 203 एवढी मजल मारली होती. 

पीएम 2.5 चेही प्रमाण लक्षणीय  
पीएम 2.5 हे बारीक धूलिकण नाक आणि घशातून सहज आपल्या फुप्फुसात किंवा धमन्यांमध्येही जाऊन बसतात. 0 ते 30 हे प्रमाण चांगले समजले जाते. या प्रमाणात औरंगाबाद आणि परिसरात केवळ पाच दिवस धूलिकणांचे प्रमाण कमी, अर्थात तीसच्या खाली होते; तर 61 पासून पुढे हा आकडा असेल, तर माफक रूपात ती हवा अशुद्ध समजली जाते. या गटानुसार औरंगाबादची हवा तब्बल 14 दिवस अशुद्ध अथवा धोकादायक होती. 

पीएम 10 आटोक्‍यात पण... 
पीएम 10 या व्याख्येअंतर्गत येणारे कण 0-50 दरम्यान असतील, तर ते धोकादायक नाहीत. 51 पेक्षा अधिक आणि 100 पेक्षा कमी असेल, तर हे प्रमाणही समाधानकारक मानले जाते. पन्नासचा आकडा ओलांडलेल्या पीएम 10चा आकडा वाढताच आहे. 100 एवढा आकडा ओलांडलेला नसला तरी पीएम 10 हे धूलिकण 20 दिवस सत्तरच्या पुढेच आहेत. 

औरंगाबादेत दुचाकींवर फिरणाऱ्यांना दम्याचा त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवतोय. एअर क्वॉलिटी इंडेक्‍स हे एकमेव कारण त्यामागे नसले तरी त्याचा वाटा नक्कीच सिंहाचा आहे. त्रासापासून वाचण्यासाठी दुचाकी चालवणाऱ्यांनी चांगल्या दर्जाचे मास्क लावणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय या दुखण्याला रोखण्यासाठी भरपूर पाणी प्यायला पाहिजे. महिन्यातील दोन ते तीन दिवस तरी सकाळच्या वाहतूक कोंडीपूर्वी कामासाठी बाहेर पडल्यास त्याचाही फायदाच होणार आहे. 
- डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे (छातीविकारतज्ज्ञ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT