jalna
jalna sakal
मराठवाडा

Jalna : लम्पी स्कीनवेळीच रोखा

सुभाष बिडे

घनसावंगी : जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य लम्पी स्कीन विषाणूजन्य त्वचारोगाचा ग्रामीण भागात पशुपालकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन जनावरांची तपासणी करावी, औषधोपचार तसेच लसीकरणांची मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान,लम्पी स्कीन वेळीच रोखण्यासाठी पशुपालकांनी पशुधनाची काळजीसह खबरदारी घेण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय तज्ज्ञांतर्फे देण्यात येत आहे.

लम्पी स्कीन हा विषाणूमुळे जनावरांना होणारा संसर्गजन्य त्वचारोग आहे. जो वेगाने पसरतो आणि विशेषत: कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या जनावरांना प्रभावित करतो. या आजारावर कोणतेही ठोस उपचार नसल्यामुळे, केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करते. काही प्रमाणात जनावरांची योग्य काळजी घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो ,असे पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे तुर्तास जालना जिल्ह्यात अंबड तालुक्‍यात जामखेड, भोकरदन तालुक्‍यात वरूड, जालना तालुक्‍यात कुंभेफळ येथे सेंटर करण्यात आले आहे. या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.

लम्पी स्कीन हा संसर्गजन्य त्वचारोग असल्याने प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता शेतकऱ्यांनी आवश्‍यक ती काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. जनावरामध्ये रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लम्पी स्कीन या जनावरांच्या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग खबरदारी घेत आहे. पहिल्या टप्प्यात ज्या भागात लम्पी स्कीन या रोगांचा संसर्ग जनावरांमध्ये दिसून आल्यास त्या भागात तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने त्या भागापासून पाच किलोमीटर अंतरावरच्या सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येते, त्यानंतर पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात येते. जिल्ह्यात लम्पी स्कीन हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षमपणे काम करीत आहे.

- डॉ.दिगंबर कांबळे

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जालना

पाळीवप्राण्यांमध्ये लम्पी स्कीन या रोगाची साथ आल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत. त्यामुळे तालुकापातळीवर सर्व गावातील जनावरांच्या तपासण्या करण्यात याव्यात, तसेच प्रत्येक गावी जाऊन जनावरांवर औषधोपचार करून लम्पी स्कीन रोगाची लक्षणे, उपचार व त्यापासून कशाप्रकारे काळजी घ्यावयाची याची इत्थंभूत माहिती पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT