जुगार खेळणारे पाेलिसांच्या ताब्यात आहेत.
जुगार खेळणारे पाेलिसांच्या ताब्यात आहेत.  sakal
मराठवाडा

jalna : जुगार अड्ड्यावर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, २६ जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

जालना - शहरातील फुकटनगर येथे सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने बुधवारी (ता.दहा) छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतले. तर पावणेचार लाखांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे.

शहरातील फुकटनगर भागात जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या पथकाने बुधवारी (ता.दहा) फुकटनगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी मोहम्मद इसा मोहम्मद इलायस (वय २९), शफी नबी शेख (वय ३२)

किसन अशोक कांबळे (वय ३०), मोहम्मद इब्राहिम मोहम्मद मोईनोद्दीन, सलमान मंजूर शहा (वय २६ (वय ३२, पाचही रा.इंदिरा नगर, जालना), मुकेश वसंतराव भोसले (वय ३४) शेख नाजीम शेख निजाम ( वय २७), शेख मुक्तार शेख हसन (वय ३६),

अंकुश किसन मोरे (वय ३४,चौघे रा. चंदनझिरा), शेख अखिल शेख मोहम्मद इलायस( वय २३, रा. सदर बाजार, जालना), शेख सफीक शेख गफुर (वय ४६ रा.जुना जालना ) , बंडू लक्ष्मण कराळे (वय ३६ रा. अंबड) आयुब मोहम्मद पठाण (वय ३५, रा. नॅशनल नगर, जालना) शेख अशफाक शेख हारुण (वय३५, रा. सदर बाजार),

अरशद खान नसीर खान पठाण ( वय २२, रा चमडा बाजार), मोहम्मद मौलाना मोहम्मद बशीर मिया (वय ४२ रा.गुलबर्गा, कर्नाटक), याशीम खैरात पठाण (वय ४० रा. हलगरागाव, ता. निलंगा जि.लातूर), शेख अफसर शेख कलीम ( वय ३१, रा. अमरशहा टाकीजवळ, जालना), नदीम खयुम शेख (वय ३०), समीर यासीन खान पठाण (वय २४,दोघे रा. हातवन ता. घनसावंगी) ,

शारुख शेख रमजानमिया शेख (वय ३० रा, संजय नगर, जालना) हे २१ संशयित मिळून आले. त्यांच्याकडून रोख ६४ हजार २७० रुपये, दोन लाख ३८ हजार ५०० रुपयांचे मोबाईल, ऑनलाइन जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याच भाग दुसऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

असे एकूण २६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य असा एकूण तीन लाख ६५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस कर्मचारी श्री. सुक्रे, श्री. शेख, श्री. जगताप, श्री. जाधव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT