फुलंब्री : महात्मा फुले चौकात जनआक्रोश मोर्चात निदर्शने करताना डॉ. कल्याण काळे यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते.
फुलंब्री : महात्मा फुले चौकात जनआक्रोश मोर्चात निदर्शने करताना डॉ. कल्याण काळे यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते.  
मराठवाडा

फुलंब्रीत कॉंग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता.26) जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कचरू काथार यांना देण्यात आले. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना डॉ. काळे म्हणाले,"" गेल्या चार-पाच वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. कर्जमाफी योजना फसवी असून, अजूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. शासनाने खरीप पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.'' यावेळी बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, जिल्हा बॅंकेचे संचालक पुंडलिक जंगले, ज्ञानेश्‍वर जाधव, अनिल बोरसे, नगरसेवक मुदस्सर पटेल, रऊफ कुरेशी, सुभाष पांचाळ, त्र्यंबक नागरे, मन्सुब बोरसे, गणेश वाघ, शेख रज्जाक, सदाशिव विटेकर, आरेफ शेख, हाफिज मन्सुरी, राजेंद्र चव्हाण, रामेश्वर गाडेकर, अंबादास गायके, सुरेश मुळे, अशोक पवार, राधाकिसन गाढे, अप्पाराव पवार, रामकृष्ण मैंद, जनार्दन तुपे, शिवाजी जाधव, बाबूराव लहाने, मुक्तेश्वर जाधव, कारभारी वाहटुळे, देविदास ढंगारे, दिगंबर तुपे आदींची उपस्थिती होती.

...या आहेत मागण्या

- मका पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने एकरी पंचवीस हजार द्या.
-टंचाईग्रस्त गावात तत्काळ पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करा.
-औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे बंद काम तत्काळ सुरू करा.
-पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT