jintur accident news tempo and two wheeler accident one killed police hospital Sakal
मराठवाडा

Jintur Accident News : टेम्पो व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार; जिंतूर तालुक्यातील दुर्घटना

जिंतूर-परभणी महामार्गावर पांगरी जवळील येसेगाव पाटी जवळ छोटा हत्ती वाहन व दुचाकीचा भीषण अपघात झाला

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : जिंतूर-परभणी महामार्गावर पांगरी जवळील येसेगाव पाटी जवळ छोटा हत्ती वाहन व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरापासून सहा किलोमीटरवर घडली. एकनाथ मारोतराव राऊत (वय ३०, रा. दुधगाव ता. जिंतूर) असे अपघाग्रस्ताचे नाव आहे.

सूत्राच्या माहितीवरून एकनाथ राऊत हे एमएच २२ ऐ जे ७२७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून परभणीकडे जात असताना समोरून जिंतूरकडे येणारा छोटा हत्ती (पॅजओ) (क्र.एम एच ३० ऐ व्ही ०९९१) या दोन वाहनांची परस्पर जोराची टक्कर होऊन अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार एकनाथ राऊत हे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडले.

अपघाताची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात व पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला शहरातील खाजगी रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन काळे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. अपघातातील मृतकास पत्नी,एक मुलगा व एक मुलगी आहे.या बातमी देईपर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganesh Visarjan 2025 : लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी सज्ज; सकाळपासूनच सुरू होणार मिरवणुका!

GST Reduction: आनंदाची बातमी! जीएसटी कपातमुळे शैक्षणिक खर्च कमी; स्टेशनरी आणि पुस्तकांसह इतर वस्तू होणार स्वस्त

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात सकाळी ९ वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Asian Hockey Cup 2025 : भारतीय महिलांचा दणदणीत विजय; थायलंडचा ११-० ने धुव्वा

SCROLL FOR NEXT