jintur tahsildar vehicle fire accident Sakal
मराठवाडा

Jintur Fire Accident : तहसील कार्यालयाच्या वाहनाने घेतला अचानक पेट; जिंतूर तहसील कार्यालयासमोरील घटना

जिंतूर येथील तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या शासकीय वाहनाला रविवारी (ता.२८) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र वाहनाचे बरेच नुकसान झाले.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : येथील तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या शासकीय वाहनाला रविवारी (ता.२८) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र वाहनाचे बरेच नुकसान झाले.

परभणी येथे पोलीस पाटील भरतीच्या परीक्षेसाठी तहसीलदार राजेश सरवदे यांची भरारी पथकात नियुक्ती असल्याने ते चालक इफ्फत पठाण, तलाठी अनिल राठोड, शिपाई नय्युम अत्तार यांच्यासह

एम.एच.२२ डि.१०११ या क्रमांकाच्या शासकीय वाहनाने जिल्ह्याच्या ठिकाणी गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास परत आल्यावर सदरील वाहन नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयासमोर लावून चालक व अधिकारी घरी गेले.

त्यानंतर एकदीड तासात वाहनाने अचानक पेट घेतला. ही घटना शिपाई माधव खरात यांनी पाहताच इतरांना माहिती दिली. तलाठी मोहसीन पठाण व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु आग वाढत जावून कार्यालयाच्या भिंतीला लावलेल्या बॅनरने पेट घेतला. त्यानंतर काही वेळातच आलेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. परंतु सदर वाहन कालबाह्य झाले असून ते निर्लेखीत होवून एक वर्ष झाले आहे. नवीन वाहन उपलब्ध झाले नसल्याने जुने वाहन डागडूजी करुन वापरत असल्याचे वाहन चालकांकडून समजले.

अग्नीशमन यंत्रणा कुचकामी : अपातकालीन स्थितीत आग विझविण्यासाठी तहसील कार्यालयात (अग्नीशमन यंत्रणा) फायर इन्स्टीग्युशर सिलेंडर बसविण्यात आले आहेत. वाहनाला आग लागलेल्या आग विझविण्याच्यावेळी सदर सिलेंडर कुचकामी ठरल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT