Manjara Project sakal
मराठवाडा

Manjara Project : पाणी राखून ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतानाही मुंडेवाडी तलावातून उपसा सुरूच

‘मांजरा’सह सिंचन प्रकल्पांत अल्पसा पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

रामदास साबळे

केज - पावसाळ्याचा तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील सिंचन प्रकल्प व इतर जलस्त्रोतात पाणीसाठा केवळ तेरा टक्के शिल्लक राहिला आहे. परतीच्या पावसाने दगा दिला तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे.‍

भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सिंचन प्रकल्पातून होणारा पाणी उपसा बंद करून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पण, तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे मुंडेवाडी साठवण तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत आहे.

तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण हे बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सिंचन, औद्योगिक क्षेत्र व पिण्याच्या पाण्यासाठी जणू वरदानच ठरले आहे.

मागील तीन वर्षांपासून तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने मांजरा धरणासह मध्यम व लघू सिंचन प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र, चालू पावसाळ्यात पावसाचे तीन महिने होत आले तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मांजरा धरणाचा पाणी पातळी मृतसाठ्याकडे येऊन केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

त्याचबरोबर तालुक्यातील सारणी (सांगवी), होळ, उंदरी, वाघे बाभूळगाव, मस्साजोग, बनकरंजा, मुळेगाव, जानेगाव, कासारी, नाव्होली, जाधव जवळा, जिवाचीवाडी, लिंबाचीवाडी क्रमांक-१, लिंबाचीवाडी या मध्यम व लघु सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेऊन भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.

यासाठी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा केवळ तेरा टक्के शिल्लक असल्याने पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. असे असतानाही सद्यःस्थितीत तालुक्यातील मुंडेवाडी येथील साठवण तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT