crime
crime 
मराठवाडा

हिंगोली : सेनगांवात सव्वादोन हजार लिटर रॉकेल पकडले

सकाळवृत्तसेवा

हिंगोली : सेनगाव येथील टी पॉईंट वर पोलिसांच्या पथकाने एका पिकप व्हॅन मधून घरगुती वापराचे सव्वा दोन हजार लिटर रॉकेल जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांवर शनिवारी ( ता. २२)पहाटे सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सेनगांव तालुक्यातील साखरा परिसरातून एका पिकअप व्हॅन मध्ये घरगुती वापराचे रॉकेल काळ्याबाजारात नेल्या जात असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक वंदना विरनक, पोलीस कर्मचारी गजेंद्र बेडगे, अनिल भारती, श्री. आठवले यांच्या पथकाने शुक्रवारी रात्रीपासूनच सेनगाव व येलदरी टी पॉईंट येथे सापळा लावला होता.

या मार्गावरून जाणारी सर्व वाहने पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांनी एक पिकअप व्हॅन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये घरगुती वापराचे निळ्या रंगाची राकेल भरलेल्या अकरा टाक्या आढळून आल्या आहेत. हे रॉकेल साखरा (ता. सेनगाव ) या प्रकरणात पोलिसांनी ऑटोतील शेख महेबुब शेख अशरफ, शेख महेबुब शेख जब्बार (दोघे रा. हिंगोली), सुभाष आत्माराम खोडवे ( रा. आंबाळा ता.हिंगोली ) या तिघांकडे चौकशी सुरू केली. मात्र त्यांना  पोलिसांना व्यवस्थित माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी पिकअप व्हॅन व निळ्या रॉकेलच्या आकरा टाक्या जप्त केल्या आहेत. या रॉकेलची किंमत सुमारे नव्वद हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता त्यांनी हे रॉकेल उटी ब्रम्हचारी ( ता. सेनगांव) येथून आणल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. याप्रकरणी आज पहाटे वरील तिघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT