poison
poison 
मराठवाडा

नांदेड : हदगावात शेतकरी महिलेची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापिकी कर्जाला कंटाळून एका शेतकरी महिलेनी विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना राजवाडी (ता. हदगाव) येथे सात मेच्या दुपारी घडली. शेतकऱ्यांपाठोपाठ आता महिला शेतकरीही आत्महत्येला जवळ करत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. 

राजवाडी (ता. हदगाव) येथील शेतकरी महिला विद्यासागर दिगंबर शिरगिरे (वय ४०) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. शेतातील उत्पन्न घटल्याने व हाताला काम मिळत नसल्याने दुहेरी संकटात सापडलेल्या या महिलेनी बँकेचे कर्ज काढले. यावर्षीही नापिकी झाल्याने कर्जाचा डोंगर वाढू लागला. आता प्रपंच कसा चालवायाचा या विवंचनेत असलेल्या विद्यासगर शिरगीरे या शेतकरी महिलेनी आपल्या शेतात मंगळवारी (ता. सात) दुपरी विष प्राशन केले. लेगच नातेवाईकांनी तिला भोकर येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती खालावत चालल्याने तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालय पोलिस चौकीचे पोलीस डब्ल्यु. के. कांबळे यांच्या माहितीवरुन व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप माने यांच्या आदेशावरून तामसा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार आर. आर. जगाडे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT