lalit
lalit 
मराठवाडा

'ललिता ते ललित'; माजलगाव पोलिस ठाण्यात रुजू 

सकाळवृत्तसेवा

माजलगांव (बीड) : लिंगबदल शस्त्रक्रीयेची परवानगी, लिंगबदलानंतर पोलिस दलात रुजू होता येईल का, होताना शारीरीक मोजमाप पुरुषाचे कि स्त्रीचे, राज्यातील पहिलाच प्रसंग असे अनेक प्रश्नांमुळे राज्यभर चर्चा झालेल्या पेालिस दलातील ललिताचा प्रवास अखेर संपला आणि मंगळवार (ता. १९) पासून ललित या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. ललीत साळवे मंगळवारी येथील शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू झाले. 

राजेगांव (ता. माजलगाव) येथील ललिता 2010 मध्ये बीड जिल्हा पोलिस दलात महिला पोलिस शिपाई म्हणून रूजू झाल्या. मागील तिन वर्षांपासुन माजलगाव शहर पोलिस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. मात्र, शरिरात लहानपणापासून मुलांचे हार्मोन्स होते. अलिकडच्या काळात शरिरात हार्मोनन्समुळे होणाऱ्या बदलामुळे त्यांना पुरुषी लक्षण जावणत होते. या कारणाने त्या मानसिक अस्वस्थ होत्या. शरीरिक बदलांमुळे त्यांनी लिंगबद्दल शस्त्रक्रिया करून घेण्याची परवानगी पोलिस अधीक्षकांकडे मागीतली.

दरम्यान, राज्याच्या पोलिस दलातील ही पहिलीच घटना असल्याने त्यांचा विनंती अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. या प्रकारात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातले. त्यांना लिंगबदलाला परवानगी मिळाली. मात्र, पोलिस दलात भरती होताना त्या महिला शिपाई म्हणून भरती झाल्या. आता लिंगबदलानंतर त्यांच्या शरिराचे मोजमाप पुरुष म्हणून ग्राह्य धरायचे कि स्त्री म्हणून असा पेच निर्माण झाला. अखेर हा पेचदेखील सुटला. दरम्यान, त्यांच्यावर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रीया झाली. शस्त्रक्रीयेनंतर गावी परतल्यानंतर त्यांचे वाजत - गाजत मिरवणुक काढून जंगी स्वागतही करण्यात आले. असा एकूण त्यांचा ललिता ते ललित प्रवासाचा शेवट झाला. अखेर मंगळवारी ललित साळवे शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रूजु झाले. पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांनी रुजू करून घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT