Veer Jawan Suryakant Telange
Veer Jawan Suryakant Telange 
मराठवाडा

लातूर : वीर जवान सूर्यकांत तेलंगे अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ : थेरगाव (ता. शिरूर अनंतपाळ) येथील शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांच्यावर शासकीय इतमामात बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर भावुक बनला होता.

सीमावर्ती भागात देशसेवा करीत असताना पठाणकोट (पंजाब) येथे झालेल्या चकमकीत गोळ्या लागून जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव अमृतसर येथून विमानाने पुण्यात, तेथून दुपारी बाराच्या सुमारास मूळगावी थेरगावला आणण्यात आले. काहीवेळ घरी, त्यानंतर प्रेमनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले.

हिपळगाव रस्त्यावरील माणिक दंडाजवळ शासकीय इंतजामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून तेलंगे यांना श्रद्धांजली वाहिली. पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाठवलेल्या शोकसंदेशाचे वाचन झाले. मान्यवरांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या.

खासदार सुधाकर शृंगारे, माजी खासदार रूपाताई पाटील, आमदार धीरज देशमुख, अभय साळुंके, अॅड. संभाजीराव पाटील, अॅड. जयश्रीताई पाटील, डॉ. शोभाताई बेंजरंगे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, तहसीलदार अतुल जटाळे, गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, राजकीय नेते, पोलिस अधिकारी- कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT