Blood Donation, Latur News
Blood Donation, Latur News  
मराठवाडा

रक्तदानासाठी सरसावले असंख्य लातूरकर, तुटवडा पडताच दाखवले सामाजिक भान

सुशांत सांगवे

लातूर  : राज्यात सगळीकडे रक्ताचा तुटवडा आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत पोचली आली आहे. आपल्या शहरातही रक्ताचा तुटवडा आहे का? आम्ही रक्त द्यायला तयार आहोत. कधी येऊ? अशी विचारणा करणारे असंख्य दुरध्वनी शहरातील वेगवेगळ्या रक्तपेढीत खणखणायला सुरवात झाली आहे. नुसतेच दुरध्वनी नाही तर रक्तदानासाठी रक्तपेढीत लातूरकर चकरा मारतानाही दिसत आहेत. यातून लातूरकरांचे सामाजिक भान दिसून येत आहे.


कोरोना विषाणूचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, रक्ताचा तुटवडा सर्वत्र जाणवू लागला आहे. लातूरातही वाढत्या उन्हामुळे रक्तदानासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. पण, आता लोकांमध्ये जागरूकता वाढल्याने रक्तदात्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. दुरध्वनी करून मी रक्तदानासाठी कधी येऊ, अशी स्वत:हून विचारणा केली जात आहे. एका रक्तपेढीत दिवसाला दहा ते १२ जण रक्तदानासाठी येत आहेत. काही रक्तपेढीत रक्तदान शिबिरांचेही आयोजन होत आहे.
लातूरकरांच्या या सहकार्यामुळे आणि सुजाणपणामुळे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा नाही, असे दिसून येत आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची येण्या-जाण्याची मोफत सोय प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नागरिकांनी येथील रक्तपेढी दूरध्वनी केल्यानंतर रक्ताची नेमकी गरज कधी आहे, हे सांगितले जात आहे. त्या दिवशी वाहन पाठवून संबंधीत व्यक्तीला रक्तदानासाठी रक्तपेढीत आणले जात आहे. रक्तदान झाल्यानंतर सरकारी वाहनातून घरी सोडले जात आहे. याशिवाय, रक्तदानासाठी शिबिरेही घेतली जात आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ओम क्लासिक अपार्टमेंट येथील रहिवाशांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिर घेतले. या शिबिरात प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, पोलिस कर्मचारी, गृहिणी, वकील अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींनी रक्तदान केले. तर भालचंद्र रक्तपेढीत रेल्वे स्थानिकामधील ४२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. वेगवेगळ्या सामाजिक संस्थाही रक्तदान शिबिर आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना रक्ताची गरज असेल तेंव्हा शिबिर आयोजित करा, असे रक्तपेढ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा ः बंदच्या काळात लातूरकरांसाठी मेयर्स चॅलेंज स्पर्धा, महापौरांनी घेतला पुढाकार

या आहेत रक्तपेढ्या
- शासकीय महाविद्यालय
- यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय (एमआयटी)
- भालचंद्र रक्तपेढी
- लातूर रक्तपेढी
- अर्पण रक्तपेढी
- माऊली रक्तपेढी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT