मराठवाडा

बऊर शिवारात आढळला बिबट्या

मंगेश शेवाळकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये बिबट्याने एका बैलाचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात मंगळवारी (ता. २५ ) बिबट्याचे छायाचित्र आढळून आले. त्यामुळे या शिवारात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कळमनुरी तालुक्यातील बऊर शिवारामध्ये शिवाजी कोकरे यांच्या शेतावर बैल बांधले होते. रविवारी  (ता. २३) रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका बैलास ठार मारले. त्यानंतर बैलास तेथून बाजूला नेले. सोमवारी (ता. २४) सकाळी कोकरे शेतात गेले असता एक बैल दिसला नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका ठिकाणी बैल मृतावस्थेत आढळून आला.  

बैलाच्या परिसरामध्ये वन्य प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळून आले. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाचे अधिकारी केशव वाबळे यांना दिली. त्यानंतर वाबळे यांनी तातडीने घटनास्थळी वनविभागाचे पथक रवाना केले. या पथकाने घटनास्थळावरून जनावरांच्या पावलांचे ठसे घेतले.

सदर ठसे बिबट्याच्या पावलाशी मिळते-जुळते असल्यामुळे वाबळे यांनी या परिसरात दोन कॅमेरे लावले होते. त्यानंतर रात्री या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. सोमवारी ( ता. २४ ) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ज्या ठिकाणी बैलाची शिकार केली. त्याठिकाणी पुन्हा बिबट्या आला. त्याने ठार केलेल्या बैलावर ताव मारतानाचे छायाचित्र चित्रदेखील निघाले आहे. आज सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेरे ताब्यात घेऊन हिंगोली येथे आणले. या कॅमेऱ्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसून आला. यामुळे या भागात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गावकऱ्यांनी तेथे जाऊ नये : केशव वाबळे, विभागीय वन अधिकारी

कळमनुरी तालुक्यातील भाऊ शिवारामध्ये बिबट्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणतः  तीन दिवस बिबट्या एकाच भागात राहतो. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढील आठवडा या भागात जाऊ नये. तसेच शेतामध्ये आठ दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जावे. कोकरे यांना वन विभागाकडून चाळीस हजाराची मदत दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT