Jalana-Constituency
Jalana-Constituency 
मराठवाडा

Loksabha 2019 : विजयाची माळ कुणाच्या गळ्यात?

भास्कर बलखंडे

जालना - जालना लोकसभेच्या जालन्यासह बदनापूर, भोकरदन, पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या सहाही विधानसभेच्या क्षेत्रात ६४.५० टक्के मतदान झाले आहे. आता लोकांना निकालाचे वेध लागले आहेत. २३ मे २०१९  रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. या मतदारसंघातून कोण विजयी होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. काही उमेदवारांच्या नावावर तर पैजाही लावण्यात येत आहेत. मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उमेदवारांच्या नावावर पैजा
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, काँग्रेसच्या वतीने विलास औताडे, तर बहुजन वंचित आघाडीच्या वतीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्यासह वीस उमेदवार रिंगणात होते. गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण मतदारसंघात विविध पक्षांकडून प्रचारसभा, कॉर्नर बैठका घेऊन प्रचार करण्यात आला. फेसबुक, व्हॉट्‌सॲपवरूनही प्रचार करण्यात आला. रविवारी (ता. २१) आणि सोमवारी (ता.२२) दोन दिवशी तर रात्रीच्या वेळी खलबते करण्यात आली. असे असले तरीही आता मतदारसंघात नेमके कोण विजयी होणार, याविषयी मतदारसंघात पैजा लावण्यात येत आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्याची गरज
जालना मतदारसंघात ६४ टक्के मतदान झाले आहे. याचाच अर्थ ३५ ते ३६ टक्के मतदारांनी मतदानाला दांडी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया सजग नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोहीम राबविण्यात आलेली असतानाही गेल्यावर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का फार काही वाढला नसल्याचे स्पष्ट  झाले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ६६ टक्के मतदान झाले होते. यावर्षीच्या निवडणुकीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २ टक्के मतदान कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मतदारांनी पुढे येणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT