Osmanabad
Osmanabad Osmanabad
मराठवाडा

हरवले मंगळसूत्र; सापडले ‘मंगल’सूत्र!

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): कचरा संकलित करणाऱ्या वाहनाच्या हूकला अनवधानाने अडीच तोळ्याचे मंगळसूत्र अडकले. ही बाब महिलेच्या लक्षात आली नाही. वाहने पुढे गेले. कचरा डेपोत वाहन रिकामे करताना चालकाला हे मंगळसूत्र दिसले. त्याने प्रामाणिकपणे ते ग्रामपंचायतीकडे परत केले. ग्रामपंचायतीने शुक्रवारी (ता. ३०) संबंधित महिलेला तिचे मंगळसूत्र परत केले. प्रामाणिकपणाचे हे ‘मंगल’सूत्र सापडले ते तालुक्यातील गुंजोटी येथे.

गुंजोटी येथे मल्लीनाथ कारभारी हे नेहमीप्रमाणे वाहनाने कचरा संकलित करीत होते. सुनीता राजेंद्र पतंगे यांनी घरातील कचरा वाहनात टाकला. पण, कचरा टाकताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र वाहनाच्या लोखंडी हुकाला अडकले. ही बाब पतंगे यांच्या लक्षात आली नाही. वाहन चालक श्री. कारभारी यांनी अन्य ठिकाणचा कचरा जमा करून तो कचरा डेपोत टाकण्यासाठी नेला. त्या ठिकाणी त्यांना मंगळसूत्र दिसून आले. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत मंगळसूत्र ग्रामपंचायत कार्यालयात जमा केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने कचरा संकलित केलेल्या भागात याची चौकशी केली. तेव्हा पतंगे यांचे मंगळसूत्र हरवल्याची माहिती प्राप्त झाली. ते मंगळसूत्र त्यांना परत करण्यात आले.

ग्रामपंचायतीने केला सत्कार

चालक श्री. कारभारी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ग्रामपंचायतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच सरस्वती कारे, उपसरपंच आयुब मुजावर, योगेश शिंदे, श्रीनिवास हिरवे, रवि देशमुख, शेषेराव खंडागळे, इंद्रजित म्हेत्रे, कौशल्या बेळमकर, विजया चव्हाण, स्नेहा पाटील, किशन पाटील, बसवराज टोंपे, सतीश कारे, ग्रामविकास अधिकारी व्यंकट मुळे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT