औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कार भाई संपतराव पवार व नटवर्य लोटू पाटील पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) डॉ. दादा गोरे, डॉ. मनोहर जाधव, कौतिकराव ठाले पाटील, श्री. पवार
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कार भाई संपतराव पवार व नटवर्य लोटू पाटील पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) डॉ. दादा गोरे, डॉ. मनोहर जाधव, कौतिकराव ठाले पाटील, श्री. पवार 
मराठवाडा

कलाकारांचे फाजील लाड बंद करा : डॉ. मोहन आगाशे 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - प्रामाणिकपणे काम केल्यास आनंद मिळतो. कलाकार असा वेगळा नसतो. उत्तम स्वयंपाक करणे, केर काढणे हीसुद्धा कला आहे. कलाकारांचे फाजील लाड बंद केले पाहिजे. काही दिवस पुरस्कार देणेसुद्धा थांबवले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी मंगळवारी (ता. 12) व्यक्त केले. 

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कार "मी लोकांचा सांगाती' या पुस्तकासाठी भाई संपतराव पवार यांना; तर "नटवर्य लोटू पाटील पुरस्कार' डॉ. आगाशे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कवी ना. धों. महानोर, डॉ. मनोहर जाधव, डॉ. दिलीप घारे, कौतिकराव ठाले पाटील, प्रकाश पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. महानोर यांच्या हस्ते पवार आणि आगाशे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

डॉ. आगाशे म्हणाले, "जगण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी लागते. आपले जगणे अर्थपूर्ण करायचे असेल तर तुम्हाला कुठल्यातरी कला प्रकाराशी मैत्री करावी लागेल. तुम्ही अशी कला निवडा ती कधीच सोडून जाणार नाही. उलट तुमच्या जीवनात आनंदच निर्माण करील.'' डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. 
 
नैसर्गिक संपत्ती, श्रमातून विकास : पवार 
"नैसर्गिक संपत्ती आणि मानवी श्रम यातून विकास करता येतो, हे मला उमगले. चळवळ यशस्वी करायची असेल, तर संवेदनशील माणसांचे कवच लाभले पाहिजे. संकटात लोकांना साथ दिल्यास ते कायम सोबत राहतात. दुष्काळात लोकांना आत्मभान देण्याचे काम करता आले. हाच प्रवास मी लोकांचा सांगाती पुस्तकात मांडला'', असे भाई संपतराव पवार म्हणाले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT