bhise
bhise 
मराठवाडा

Maratha Kranti Morcha : रेणापूरमध्ये आमदार भिसेंना धक्काबुक्की, गाडीचा काचाही फोडल्या

सुधाकर दहिफळे

रेणापूर (लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार अॅड. त्र्यंबक भिसे यांना गुरूवारी (ता. नऊ) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोडही केली. या घटनेनंतर वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले. काहींनी मध्यस्थी करून आमदार भिसे यांना तेथून बाहेर काढून गव्हाण रस्त्यावर आणून सोडले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बंद दरम्यान रेणापूर येथील पिंपळफाटा येथे मराठा समाजाच्या वतीने सकाळपासूनच ठिय्या व रास्ता रोको आंदोलन सुरु होते. यावेळी आमदार भिसे हे आंदोलनात सहभागी होम्यासाठी पिंपळफाटा येथे आले. गाडीतून उतरुन आंदोलकांसमोर बोलत असताना काहींनी `तुम्ही अगोदर आमदारकीचा राजीनामा द्या, त्यानंतर आमच्याशी बोला`, अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. यातूनच संतप्त आंदोलकांनी आमदार भिसे यांना धकाबुक्की केली. याच दरम्यान काहींनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार भिसे यांनी तेथून काढतापाय घेतला. यामुळे पिंपळफाट्यावर काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला. काहींनी आमदार भिसे यांना तेथून बाहेर आण गव्हाण रोडवर आणुन सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT