Mahashivratri Wishes 2022 Har Har Mahadev city is buzzing
Mahashivratri Wishes 2022 Har Har Mahadev city is buzzing  sakal
मराठवाडा

हर.. हर ...महादेवाच्या जयघोषात औंढा नगरी दुमदुमली

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे मंगळवारी ता.एक महाशिवरात्री निमित्त नागनाथ प्रभूचे दर्शन घेण्यासाठी हजारों भाविक दाखल झाले.मंदिरात महाशिवरात्री निमित्त आमदार संतोष बांगर व तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या हस्ते महापुजा झाली.

यावर्षी देवस्थानच्या वतीने महाशिवरात्र उत्सव हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यामध्ये मंदिरावर पूर्ण विद्युत रोषणाई व मंदिरातील आतमध्ये सर्वत्र फुलांनी मंदिर सजवण्यात आले होते. देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले सपत्नीक तसेच आमदार संतोष बांगर सपत्नीक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.तसेच विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव, मुलगा पुष्पराज सातव,मुलगी तितली सातव यांनीही रात्री महाशिवरात्रीनिमित्ताने श्री नागनाथ देवाची महापूजा केली.

महाशिवरात्रीनिमित्त रात्री दोन वाजता भाविकांच्या दर्शनासाठी श्री नागनाथ मंदिर खुले करण्यात आले.भाविक भक्तांना यावर्षी मंदिराची आकर्षक रोषणाई पाहण्यास मिळाली. देवस्थानच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाप्रसाद वाटप करण्यात आले. मंदिर परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देवस्थानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले व पोलिस प्रशासनाची मंदिर परिसरासह औंढा नगरीत करडी नजर होती.

तसेच शिवलिंगाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली .विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट केल्याने मंदिरासह परिसर उजळून निघाला होता. महाशिवरात्री निमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात मधून भाविक भक्त हे श्री नागनाथ देवाच्या दर्शनासाठी औंढा नगरीमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये कर्नाटक ,आंध्रा ,तामिळनाडू सह तेलंगणा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून भाविक भक्तही दिंड्या घेऊन हर.. हर महादेव ..,बम ..बम... भोले गजरामध्ये औंढा नगरीमध्ये रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.

दरम्यान महापुजेवेळी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी उपसभापती अनिल देशमुख,नगरसेवक मनोज देशमुख,नगरसेविका सुनिता जावळे,रुग्णकल्याण समितीचे सदस्य माधव गोरे,लल्लादेव माजीनगरसेवक सुमेध मुळे बाळासाहेब देशमुख ,सुरेश जावळे,पंकज जाधव,संदीप गोबाडे यांच्यासह देवस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, चंद्रशेखर भोपी, हरिहर भोपी ,रवि भोपी आदी उपस्थित होते .शांततेच्या वातावरणामध्ये भाविक भक्तांनी दिवसभर श्री नागनाथ देवाचे रांगेमध्ये दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

SCROLL FOR NEXT