dog
dog 
मराठवाडा

माद्यांपेक्षा नरांची संख्या चौपट

मधुकर कांबळे

औरंगाबाद : नसबंदीच्या अपुऱ्या सोयी, श्‍वानपथकाचा अभाव आणि त्यातच साचत असलेल्या कचऱ्यावर मनसोक्त खाण्याची सोय झाल्याने शहरभर मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या 2012 च्या पशुगणनेनुसार आधीच जिल्ह्यात पाळीव कुत्र्यांची संख्या 29 हजारांवर गेली असून त्यात आता मोकाट कुत्र्यांची भर पडली आहे. शहरातील कचराकोंडीमुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत आणखीनच भर पडली आहे. विशेष म्हणजे, शहरात माद्यांपेक्षा नरांची चौपट, तर ग्रामीण भागात दुप्पट संख्या आहे.

प्राण्यांमध्ये कुत्रा हा इमानदार, स्वामीनिष्ठ मानला जातो. यामुळे शेतीची, घराची आणि पशुधनांची राखण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्रे पाळले जातात. गाव शहराजवळच्या शेतांमध्ये उसाच्या फडात ऊस खाण्यासाठी येणारे कोल्हे आणि मानवी वस्तीत राहणाऱ्या कुत्र्यांमध्ये संघर्ष होऊन एखादा पिसाळलेला कोल्हा चावला तर कुत्रे किंवा त्यांची पिले पिसाळण्याची शक्‍यता असते आणि त्यातून इतरांना ते चावले तर रेबीजची लागण होण्याचा धोका वाढला आहे. 2012 च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात कुत्र्यांची संख्या 29 हजार 763 इतकी आहे. त्यात 8 हजार 520 माद्या, तर 21 हजार 243 नर असल्याचे आढळले आहे. पाच वर्षांपूर्वीची ही संख्या असून यात आता आणखी वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

0 शहरात दहा महिन्यांत 1350 कुत्र्यांची नसबंदी
0 महापालिकेचे श्‍वानपथक फक्‍त एक
0 नसबंदी करण्यासाठी केवळ एकच केंद्र

जिल्ह्यातील संख्या (स्रोत : 2012 ची पशुगणना)
तालुका................नर........मादी
औरंगाबाद : .......5434.......1692
पैठण : .............2625........1008
फुलंब्री : ............2226........631
वैजापूर :...........4016.........2057
गंगापूर :...........1867.........896
कन्नड : ..........3492..........1056
खुलताबाद : ........1839.........715
सिल्लोड : ..........2704........846
सोयगाव : ..........592.........507
औरंगाबाद शहर : ...4152.......888

नसबंदी केंद्रे वाढवावी
कुत्री एकावेळी 8 ते 10 पिलांना जन्म देते. महिन्याला सरासरी पाचशेची भर पडते. या आठ-दहांपैकी त्यांच्यात मृत्यूचेही प्रमाण मोठे असले, तरी ही वाढती संख्या गंभीरच आहे. कुत्र्यांची नसबंदी करण्याचे प्रमाण व केंद्र वाढले पाहिजेत. सतत कुत्रे पकडून नसबंदी करावी लागेल. घरगुती कुत्र्यांची, त्यांच्या पिलांची, जर पिले इतरांना दिली तर त्याची महापालिकेकडे सविस्तर नोंद असली पाहिजे.
- डॉ. अनिल भादेकर, पशुवैद्यक, श्‍वानतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT