Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काल काँग्रेसकडून करण्यात आली.
Kasparov on Rahul Gandhi
Kasparov on Rahul Gandhi

Loksabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काल काँग्रेसकडून करण्यात आली. त्यानंतर भाजपकडून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. पण या ट्रोलर्समध्ये एक आश्चर्यकारक बाब म्हणजे बुद्धिबळपटू माजी चॅम्पियन गॅरी कास्परोव यांनी देखील राहुल गांधींची खिल्ली उडवत त्यांना ट्रोल केलं. (Traditional dictates that you should first win from raebareli before challenging for the top says Garry Kasparov)

Kasparov on Rahul Gandhi
Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

कास्परोव यांनी ट्विटरवर लिहिलं की, "भारतातील लोक म्हणताहेत तुम्हाला उच्च स्तरावर आव्हान निर्माण करण्यापूर्वी रायबरेलीतून जिंकावं लागेल. उच्च स्तरावर म्हणताना कास्परोव यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडं इशारा होता" (Latest Marathi News)

Kasparov on Rahul Gandhi
Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

राहुल गांधी अमेठीतून लढतील अशी सर्वांना दाट शक्यता वाटत असताना अचानक ते रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली. पक्षाच्या या निर्णयावर काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी ही राजकीय बुद्धिबळाची चाल असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसनं नुकतेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या मोबाईल बुद्धिबळ खेळत असल्याचा राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. (Marathi Tajya Batmya)

या व्हिडिओत राहुल गांधी यांनी कास्परोव हा आपला आवडता बुद्धिबळपटू असल्याचं म्हटलं होतं. तसेच खेळ आणि राजकारणात साम्य असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी स्वतःला राजकीय नेत्यांमध्ये सर्वात चांगला बुद्धिबळ खेळाडू म्हटलं होतं. (Latest Maharashtra News)

राहुल गांधींच्या याच व्हिडिओवर पत्रकार लेखक संदीप घोष यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की, "बरं झालं कास्परोव आणि विश्वनाथ आनंद लवकर निवृत्त झाले आणि त्यांना आमच्याकाळातील महान बुद्धिबळपटूचा सामना करावा लागला नाही " घोष यांनी ही पोस्ट काप्सरोव आणि आनंद यांनाही टॅग केली होती. याला उत्तर देताना काप्सरोव यांनी ही पोस्ट केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com